दूषीत पाण्यामुळे जांभा येथे डायरीयाची लागण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जुलै 2018

प्राथमिक आरोग्य केंद्र पारद अंतर्गत येत असलेल्या जांभा बु. येथे २५ जूनपासून २० ते २५ रूग्णांना डायरीयाची लागण झाली आहे.

अकोला (मूर्तीजापूर) - तालुक्यातील जांभा बु. येथे दूषीत पाण्यामुळे २५ जूनपासून डायरीयाची लागण झाली आहे. गावात दूषीत पाणी पुरवठा केल्या जात असून जलवाहिनीला ठिकठिकाणी गळती आहे. गावातील २० ते २५ रूग्णांवर स्थानिक रूग्णालयात दाखल आले असून परीस्थिती नियंत्रणात आहे. 

प्राथमिक आरोग्य केंद्र पारद अंतर्गत येत असलेल्या जांभा बु. येथे २५ जूनपासून २० ते २५ रूग्णांना डायरीयाची लागण झाली आहे. या गावातील पिण्याच्या पाण्याची टाकीची साफसफाई न करणे, त्यामध्ये जंतुनाशक पावडरचा उपयोग न करणे, जलवाहिनीला ठिकठिकाणी असलेली गळती, यामुळे ग्रामस्थांना दूषीत पाणी प्यावे लागत आहे. यामुळे गावात डायरीयाची लागण झाली येथील रूग्णावर मंगरूळ कांबेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. मोहोड व कर्मचाऱ्यांनी गावात जावून रूग्णाची तपासणी करून औषधोपचार करीत आहेत. यामध्ये नितेश श्रीराव, नंदू पेठकर, ओंकार गिरी, उजवला बढीये, नेताजी तायडे, बबलु हुतके, सुनिता गिरी, मिरा जामनीक, सरस्वताबाई गिरी यांच्यावर मूर्तीजापुर येथील श्रीमती लक्षमीबाई देशमुख सामान्य उपजिल्हा रूग्णालयात उपचार करण्यात आले आहे. तर कलावती गुलाबराव तायडे उपचार घेत असून विजुबाई तायडे यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे दाखल आले आहे. तर बरेच रूग्णांनी खाजगी रूग्णालयात जावून उपचार घेतले. दरम्यान, प्राथमिक आरोग्य केंद्र पारद, उपकेंद्र मंगरूळ कांबे येथील डॉकटर व कर्मचाऱ्यांनी संपूर्ण गावात औषधोपचार करीत आहेत. सचिव गत सहा महिण्यापासून गावात नियमित न येणे, सहकार्य न करणे, कर्तव्यात कसुर करीत असल्याचे ग्रामपंचायत सदस्य तथा माजी सरपंच विठ्ठल किसन उबाळे यांनी सांगितले.

डायरीयाची लागण झाल्यावर पाणी निर्जंतुकीकरण करण्यासाठी लागणाऱ्या औषधीचा धनादेश ४ जुलै ला किशोर मेडिकलला देय असल्याची माहिती मिळाली आहे.
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: dairiya infection due to contaminated water at Jambha