अमरावती विभागात दुग्धव्यवसायाला घरघर 

कृष्णा लोखंडे
गुरुवार, 26 एप्रिल 2018

अमरावती - अमरावती विभागांतर्गत पाच जिल्ह्यांच्या पशुधनात मोठी घट झाल्याने या विभागातील दुग्धव्यवसाय धोक्‍यात आला आहे. 2012 मधील दुग्धोत्पादनात विद्यमानस्थितीत 8 लाख 77 हजार लिटरने घट झाली. सहा वर्षांपूर्वी या विभागात 29 लाख 25 हजार लिटर दुधाचे उत्पादन होते. 

अमरावती - अमरावती विभागांतर्गत पाच जिल्ह्यांच्या पशुधनात मोठी घट झाल्याने या विभागातील दुग्धव्यवसाय धोक्‍यात आला आहे. 2012 मधील दुग्धोत्पादनात विद्यमानस्थितीत 8 लाख 77 हजार लिटरने घट झाली. सहा वर्षांपूर्वी या विभागात 29 लाख 25 हजार लिटर दुधाचे उत्पादन होते. 

19 व्या पशुगणनेत अमरावती विभागात 3 लाख 49 हजार 498 दुभत्या गाई होत्या. यात विदेशी वा संकरित गाईची संख्या 41 हजार 423 व गावठी अथवा देशी गाई 3 लाख 80 हजार 75 इतक्‍या होत्या. 1 लाख 68 हजार 278 म्हशींची गणना झाली. दुधाचे उत्पादन देऊ शकणारे एकूण 5 लाख 17 हजार 774 पशुधन या विभागात उपलब्ध होते. त्यापासून 29 लाख 25 हजार 436 लिटर दुधाचे उत्पादन होत होते. गाईंपासून 17 लाख 47 हजार 490; तर म्हशींपासून 11 लाख 77 हजार 946 लिटर दूध मिळत होते. शासकीय दुग्धव्यवसाय त्यामुळे बऱ्यापैकी सुरू होता. 

गेल्या सहा वर्षांत शेतीक्षेत्रात झालेली घट बघता पशुधन 30 टक्‍क्‍यांनी घटले. चारा-पाण्याच्या भीषण टंचाईमुळे पशुधनात घट झाल्याचे पशुसंवर्धन विभागाचे मत आहे. विद्यमान स्थितीत विभागात दुभत्या गाईंची संख्या 2 लाख 44 हजार 649; तर म्हशींची संख्या 1 लाख 77 हजार 795 इतकी आहे. एकूण 4 लाख 22 हजार 444 पशुधनापासून आज 20 लाख 47 हजार 810 लिटर दुधाचे उत्पादन मिळते. सहा वर्षांत 8 लाख 77 हजार 626 लिटरने घट आली. 

शासकीय दुग्धव्यवसाय बंद 
सामान्य नागरिकांना किमान परवडणाऱ्या भावात दूध उपलब्ध करून देण्यासोबतच शेतकरी व पशुपालकांना शाश्‍वत रोजगार मिळावा, यासाठी शासकीय दूध यंत्रणा उभारली गेली. दूध डेअरीचे जाळे विणले गेले. पंतप्रधान पॅकेजमधूनही या व्यवसायाला चालना मिळावी, यासाठी विशेष तरतूद करण्यात आली. तथापि उत्पादन घसरल्याने आता शासकीय व्यवसाय धोक्‍यात आले. त्याचे कारण समोर करीत तो राष्ट्रीय पातळीवरील मदर्स डेअरी या कंपनीकडे वर्ग करण्यात आला. 

विभागातील तुलनात्मक स्थिती 

पशुधन - वर्ष 2012 - दूध उत्पादन - वर्ष 2018 - दूध उत्पादन 
दुभत्या गाई - 3,49,498 - 17,47,490- 2,44,649 - 12,23,245 
दुभत्या म्हशी - 1,68,278 - 11,77,946 - 1,17,795 - 8,24,565 

एकूण - 5,17,776 - 29,25,436 - 4,22,444 - 20,47,810

Web Title: Dairying business in Amravati division loss