पावसाचा धुमाकूळ; पीक मातीमोल 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 2 नोव्हेंबर 2019

- नुकसानीचा आकडा वाढण्याची भीती 
- सोयाबीन तसेच कापूस पिकांचे मोठे नुकसान 
- पावसा8ने थोडी उसंत घेतल्याने पंचनामे करण्याच्या कामाने घेतला होता वेग 
- अनेक भागात कोसळला ढग फुटी सारखा पाऊस 

यवतमाळ : दिवाळीच्या पूर्व संध्येपासून जिल्ह्यात पावसाने हजेरी लावली आहे. कमी अधिक प्रमाणात असलेल्या पावसाने दिवाळीनंतर जोरदार हजेरी लावली. शुक्रवारी पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. विजेचा कडकडाटसह आलेल्या पावसाने अक्षरशः धुमाकूळ घातला. यामुळे उर्वरित सोयाबीन तसेच कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले असून, नुकसानीचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 

No photo description available.
सतत कमी अधिक प्रमाणात सुरू असलेल्या पावसामुळे सोयाबीन तसेच कापूस पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यांचे पंचनामे करण्याचे काम सुरू झाले आहे. दोन दिवसांपासून पावसाने थोडी उसंत घेतल्याने पंचनामे करण्याचे काम वेगाने सुरू झाले होते. शेतकऱ्यांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला होता. मात्र, शुक्रवारी (ता. 1) सायंकाळी पावसाने पुन्हा दमदार हजेरी लावली. अनेक भागात ढग फुटी सारखा पाऊस कोसळत होता. यामुळे काही दिवसांपूर्वी आलेल्या पावसातून बचावलेले पीक ही आता हातून जाण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. यामुळे दोन दिवसांपूर्वी महसूल विभागाने जाहीर केलेल्या आकडेवारीत मोठी वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Damage to crops due to rainfall