खोड कीड पिकांसाठी नुकसानकारक

Damage of Khod crops is losses
Damage of Khod crops is losses

संग्रामपूर : (बुलडाणा) तालुक्यातील सोयाबीन पिकांवर खोडकिडी आणि खोड माशीचा भयंकर अटॅक आल्याने 15 हजार 575 हेक्टर क्षेत्र बाधित झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. 31 ऑगस्टचे सायंकाळपर्यंत पिकेवि अकोला आणि केविके जळगाव जाचे शास्त्रज्ञ तसेच तंत्र अधिकारी आणि सहा तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी यांनी सामूहिक पाहणी केली. यामध्ये खोड कीड सर्वात जास्त नुकसानकारक असून, आजच जवळपास 40 ते 50 टक्के उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यताही वर्तविण्यात आली आहे. 

खारपान पट्टा आणि आर्थिकदृष्ट्या मागासलेपणाचा डाग असलेल्या तालुक्यात यंदा पुन्हा शेती व्यवसायावर आस्मानी संकट करून उभे ठाकले आहे. कपाशी, उडीद, मूग, ज्वारी या पिकाला कंटाळून सोयाबीन पिकावर भिस्त ठेऊन या तालुक्यात पेरणी वाढत गेली. सतत तीन वर्षांपासून या तालुक्यात सोयाबीन पिकाने शेतकऱयांना दगा दिला आहे. यंदा पावसाची सुरवात शेतकऱ्यासाठी  आशेचा किरण ठरणार असे वाटत होते.

पेरणी ही चांगली सदली. पीक डोलत असताना ऐन बहारात शेंगा लागत असताना खोड माशी आणि खोडकीडा याचे आक्रमण उत्पादनाचे दृष्टीने मोठे घातक ठरणारे आहे. एकही झाड यातून सुटले नाही. कृषी विभागाला याची माहिती मिळताच 30 ऑगस्ट रोजी तालुका कृषी अधिकारी ज्ञानेश्वर सवडतकर पंचायत समितीचे सी पी उदरें, कृषी सहायक असमबे यांनी पाहणी केली. त्यात त्यांना खोडकिडीचा प्रादुर्भाव दिसून आला. म्हणून 31 ऑगस्टला पिकेवि अकोलाचे शास्त्रज्ञ डॉ. एम. एस. खाकरे, डॉ. सुनील भालकरे, डॉ. योगेश इंगळे, जळगाव जा केविकेचे डॉ. संजय उमाळे याचे सह बुलडाणाचे तंत्र अधिकारी सी एन पाटील, टी ओ ए व्ही चोपडे, देऊळगाव राजा बिपीन राठोड, सिदखेड राजाचे वसंत राठोड, शेगावचे संजय ढाकणे, जळगाव जाचे बी ए कासार, मलकापूरचे एन के ताऊत, संग्रामपूरचे ज्ञानेश्वर सवडतकर, मंडळ अधिकारी कु.एस एस पोवार, जी डी नागे, कृषी सहाय्यक असबे, मोहिते आदी कर्मचारी सहभागी होते. 

शेतकऱ्यांनी या संकटाला घाबरून जाऊ नये. ट्रायजोफोसची फवारणी केल्यास बरेच प्रमाणात हा अटॅक कमी होऊ शकतो. असे आवाहन यावेळी शास्त्रज्ञांनी शेतकऱ्यांना केले. तसेच वेळोवेळी कृषी विभागाशी संपर्क करावा असेही सांगण्यात आले. यादरम्यान कृषीच्या सर्व अधिकारी वर्गाने चांगेफळ येथे हरने याची रेशीम शेती राजू अवचार याचे सोयाबीनचे शेत वरवट बकाल येथील नंदू बोडखे व इतर शेतकऱ्यांचे सोयाबीन क्षेत्र आणि सोनाळा नंदकिशोर अग्रवाल याचे कपाशी पिकाची पाहणी केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com