शहरी नक्षलवाद फोफावतोय - मोहन भागवत

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 ऑक्टोबर 2018

नागपूर - ‘दुर्गम भागांमधील हिंसक कारवायांचे पालनपोषण करणारा शहरी नक्षलवाद सध्या वेगाने फोफावतो आहे. छोट्या संघटनांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांशी संपर्क वाढवून अनुयायी वर्ग उभा केला जात आहे. शत्रूराष्ट्रांच्या मदतीने हा राष्ट्रदोह होत आहे. सोशल मीडियावर येणारा चिथावणीखोर मजकूर पाकिस्तान, इटली, अमेरिका येथून येतो की काय, अशी शंका येते, असे मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी गुरुवारी संघटनेच्या विजयादशमी मेळाव्यात व्यक्त केले.

‘भारत तेरे टुकडे होंगे’ असे नारे देणाऱ्या आंदोलकांमागे काही प्रमुख चेहरे आहेत. चिथावणीखोर भाषणांमुळे तेही लोकांना माहिती झालेले आहेत. दहशतवादाशी संबंध ठेवणाऱ्या या लोकांच्या मनात अचानक पीडितांबद्दल संवेदना कशा निर्माण झाल्या, याचाही विचार व्हायला हवा, असे ते म्हणाले. 
शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश करण्यास परवानगी देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरही भागवत त्यांनी नापसंती दर्शवली. या मंदिरात १० ते ५० वयोगटातील महिलांना प्रवेशबंदीची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू होती. या प्रथेचे पालन करणाऱ्या महिलांचे प्रमाण मोठे आहे. न्यायालयाने निर्णय देताना त्यांच्या भावनांचा विचार केला केला नाही, असे ते म्हणाले.

आगामी निवडणुकांमध्ये पुढची पाच किंवा अनेक वर्षे पश्‍चाताप होणार नाही, याचा विचार करून मतदान करा. उपलब्ध उमेदवारांपैकी सर्वोत्तम निवडा, अन्यथा नोटाचा पर्याय आहे. पण नोटा वापरताना तो आत्मघाती ठरणार नाही, याचीही काळजी घ्या, असे आवाहनही  केले.

तत्पूर्वी स्वयंसेवकांचे पथसंचलन व कवायतीही झाल्या. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय रस्ते व भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी,  पद्मश्री उस्ताद रशीद खाँ आदी या वेळी उपस्थित होते.

संघ शाखांनी बालकांचे रक्षण करावे
देशभरातील खेडोपाड्यांत सुरू असलेल्या संघाच्या शाखांनी बालकांचे, विशेषत: मुलींचे रक्षण करण्यासाठी ‘फायरवॉल’ बनावे, असे आवाहन नोबेल शांतता पुरस्कारविजेते ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते कैलाश सत्यार्थी यांनी केले. महिलांना घरात, कामाच्या ठिकाणी आणि अन्य सार्वजनिक स्थळी भीती, दहशत व असुरक्षिततेचा सामना करावा लागत आहे. आजही देशात अल्पवयीन मुलींवर बलात्कार होतात. भाऊ बहिणीवर, बाप मुलीवर अत्याचार करतोय. याला इंटरनेटवरील पोर्नोग्राफीही तेवढीच कारणीभूत आहे. हा काळा व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला असून त्यावर बंदीची आवश्‍यकता आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dasara Campaign City Naxalism Mohan Bhagwat