Video : हाही एक 'दशरथ मांझी', वाचा ही कहाणी

दीपक खेकारे 
Saturday, 28 December 2019

"दशरथ मांझी'ची कहाणी सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी "मांझी: द माउंटेन मॅन' हा चित्रपट केतन मेहता यांनी प्रदर्शित केला होता. यात बिहार राज्यातील गलहौर येथील "माऊंटन मॅन' अशी ओळख असलेल्या "दशरथ मांझी'ची कहाणी दाखविण्यात आली होती. चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदुरातील "मांझी'ला आपण चित्रपटात बघू शकनार नाही. तेव्हा हाही एक "दशरथ मांझी', वाचा ही कहाणी... 

गडचांदूर (जि. चंद्रपूर) : बिहार राज्यातील गलहौर येथील 'माऊंटन मॅन' अशी ओळख असलेल्या 'दशरथ मांझी'ला आपण ओळखत असालच..! एकट्याने अख्या पहाड खोदला अन्‌ ये-जा करण्यासाठी रस्ता तयार केला. त्याने आपल्या प्रेमासाठी पहाड खोदला होता. केवळ एक हातोडी आणि छन्नीच्या सहाय्याने 360 फूट लांब, 30 फूट रूंद आणि 25 फूट उंच पहाड फोडून रस्ता तयार केला होता. त्यांना हा रस्ता तयार करण्यासाठी तब्बल 22 वर्षे लागले. 

सविस्तर वाचा - 'रासलीले'चा डाव रंगात येण्यापूर्वीच उधळला

'दशरथ मांझी'ची कहाणी सर्वांपर्यंत पोहोचावी यासाठी "मांझी: द माउंटेन मॅन' हा चित्रपट केतन मेहता यांनी प्रदर्शित केला होता. या चित्रपटात नवाजुद्दील सिद्दिकी याने "दशरथ मांझी'ची भूमिका साकारली होती. यात त्यांचा प्रवास दाखविण्यात आला होता. रस्ते किती आवश्‍यक आहे, हाही संदेश यातून देण्यात आला होता. "दशरथ मांझी'कडून प्रेरणा घेत चंद्रपूर जिल्ह्यातील गडचांदुरातील "मांझी' निलकंठ पेंदोर यांनी घेत रस्ता तयार केला आहे. दशरथ मांझी सारखे मोठे कर्तृत्व पेंदोर यांचे नसले तरी त्यांचे हे लहानसे कर्तृत्व वाखाण्यासारखेच आहे.

बापरे! - व्वारे डॉक्‍टर! युवतीला केली शरीरसुखाची मागणी

रस्त्याची समस्या आजघडीला फार मोठी झाली आहे. रस्ते अपघातात अनेकांना जीवही गमवावा लागला आहे. सरकारकडून रस्ते तयार करण्यात येत असले तरी ठेकेदारांकडून त्यांच्या प्रयत्नांवर माती टाकण्यात येत आहे. याच रस्त्यामुळे सतत होणारे अपघात निलकंठ पेंदोरे यांना बघविले नाही. प्रशासनाची वाट न बघता त्यांनी फावडा हातात घेतला अन्‌ स्वत: श्रमदान करून मार्गाची डागडुजी केली. यासाठी जवळचा पैसाही त्यांनी खर्ची घातला.

Image may contain: one or more people and outdoor
रस्त्यावर पडलेले खड्डे 

गडचांदूर बसस्थानकाच्या बाजूने शहरात जाण्यासाठी कच्च्या मार्ग आहे. ग्रामपंचायत काळापासून या मार्गाची अवस्था बिकट आहे. पाच वर्षांपूर्वी अस्तित्वात आलेल्या नगर परिषदनंतरही हा मार्ग "जैसे थे' आहे. हा मार्ग विवादित असून, प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याची माहिती आहे. ओबडधोबड असलेल्या या मार्गातील खड्ड्यांमुळे लहानमोठे अपघात झालेले आहेत. मार्ग दुरुस्तीची मागणी नागरिकांनी वारंवार केली; मात्र नागरिकांचा आवाज नगर परिषदेला ऐकू आलाच नाही. 

श्रमदानातून प्रश्‍न सुटू शकतात

दररोज सुरू असलेल्या अपघातांची मालिका बघून मार्गालगत घर असलेले निलकंठ पेंदोर हे व्यतित झाले. कुणाचीही वाट न बघता पेंदोर यांनी हातात फावडा उचला. स्वखर्च आणि श्रमदानातून थोडाफार का होईना पण या रस्त्यावरील खड्डे त्यांनी बुजविले. पेंदोर यांना रस्ता दुरुस्ती करताना बघून अनेकांनी त्यांचे तोंडभर कौतुक केले. श्रमदानाने अनेक प्रश्‍न सुटू शकतात हे पेंदोर यांनी दाखवून दिले आहे. निर्लज्ज कामचूकारपणाचा कळस गाठणाऱ्या प्रशाशनाला पेंदोर यांनी आपल्या कृतीतून जोरदार चपराक दिली आहे हे ही तेवढेच खरे..!

Image may contain: outdoor

प्रशासन झोपेत 
चार वर्षांपासून नागर परिषदेला रस्ता दुरुस्तीसाठी निवेदन दिले. मात्र, कुणीही या रस्त्याच्या दुरुस्तीकडे लक्ष दिले नाही. कित्येक अपघात घडल्यामुळे मी खड्डे बुजविले. प्रशासन नुसते झोपेत आहेत. 
- निलकंठ पेंदोरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dashrath Manjhi also in Chandrapur