जळू शिवारात मायलेकीचा खून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 15 नोव्हेंबर 2016

अमरावती -  नांदगावखंडेश्‍वर तालुक्‍यातील जळू येथे अल्पवयीन पुतण्याने विळ्याने हल्ला करून काकूसह आठ वर्षाच्या चुलत बहिणीचा निर्घृण खून केला. खुनानंतर आठ वर्षांच्या चिमुरडीला त्याच शेतातील विहिरीत फेकल्याची खळबळजनक घटना सोमवारी (ता. 14) सायंकाळी उघडकीस आली. 

अमरावती -  नांदगावखंडेश्‍वर तालुक्‍यातील जळू येथे अल्पवयीन पुतण्याने विळ्याने हल्ला करून काकूसह आठ वर्षाच्या चुलत बहिणीचा निर्घृण खून केला. खुनानंतर आठ वर्षांच्या चिमुरडीला त्याच शेतातील विहिरीत फेकल्याची खळबळजनक घटना सोमवारी (ता. 14) सायंकाळी उघडकीस आली. 

पद्मा विलास मालपे (वय 38, जुनीवस्ती, बडनेरा) व हर्षाली विलास मालपे (वय 8) असे खून झालेल्या माललेकींचे नाव आहे. हर्षाली हिचा मृतदेह रात्री साडेआठच्या सुमारास ग्रामस्थांच्या मदतीने विहिरीबाहेर काढला. हर्षाली हिच्याही गळ्यावर विळ्याने चिरल्याचा वार आहे; असे लोणी पोलिसांनी सांगितले. काकूचा खून केल्यानंतर चुलत बहिणीला विहिरीत फेकणारा पुतण्या अल्पवयीन (वय 17) आहे. मालपे कुटुंब जुनीवस्ती, बडनेरा परिसरातील रहिवासी आहे. पद्मा मालपे यांचे पुतण्याकडे काही दिवसांपासून उधार पैसे होते; अशी माहिती पुढे आली. पुतण्या हा जळू शिवारात मामाच्या शेतात काम करीत होता. सोमवारी (ता. 14) पद्मा मालपे यांनी पैसे मागण्यासाठी पुतण्याला फोन केला. त्याने पैसे घेण्यासाठी जळू येथील मामाच्या शेतात बोलावले. पद्मा मालपे या मुलगी हर्षालीला सोबत घेऊन पुतण्या काम करीत असलेल्या शेतामध्ये गेली. दोघांमध्ये पैसे मागण्यावरून कडाक्‍याचे भांडण झाले. त्याचवेळी रागाच्या भरात अल्पवयीनाने काकू पद्मावर विळ्याने सपासप वार केले तसेच दगडाने ठेचून तिचा निर्घृण खून केला. या घटनेमुळे घाबरलेली चिमुकली हर्षाली हिच्यावरही विळ्याने हल्ला करून तिला विहिरीत फेकले; असे अटकेनंतर अल्पवयीनाने सांगितले. दुपारी एकच्या सुमारास घडलेली ही घटना सायंकाळी उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पद्मा मालपे यांचा मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. रात्री साडेआठपर्यंत ज्या विहिरीत हर्षालीला फेकून दिल्याचे अटकेनंतर अल्पवयीनाने पोलिसांना सांगितले. त्याच विहिरीतून हर्षालीचाही मृतदेह बाहेर काढला. स्थानिक गुन्हेशाखेसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट दिली. वृत्त लिहीस्तोवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई सुरू असल्याचे लोणी पोलिसांनी सांगितले.

Web Title: daughter & mother murder case