प्रेमाच्या नादात स्वतःच्या वाढदिवशीच घेतला गळफास

सकाळ न्यूज नेटवर्क
रविवार, 20 जानेवारी 2019

चिमूर नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या शेडेगाव येथील युवकाचे एका मुलीसोबत अनेक दिवसापासून प्रेम होते. प्रेमाचा राग अनावर झाल्याने युवकाने आपल्या स्वतःच्या जन्मदिनीच घरी फास बांधून रविवारी दुपारी आत्महत्या केली. मृत युवकाचे संदीप शंकर जांभूळे असे नाव असून मृताचे वय 27 वर्ष होते. तो शेडेगाव येथील रहिवासी होता.

चिमूर- चिमूर नगरपरिषद अंतर्गत येत असलेल्या शेडेगाव येथील युवकाचे एका मुलीसोबत अनेक दिवसापासून प्रेम होते. प्रेमाचा राग अनावर झाल्याने युवकाने आपल्या स्वतःच्या जन्मदिनीच घरी फास बांधून रविवारी दुपारी आत्महत्या केली. मृत युवकाचे संदीप शंकर जांभूळे असे नाव असून मृताचे वय 27 वर्ष होते. तो शेडेगाव येथील रहिवासी होता.

संदीप हा चिमूर सीएमपीडीआय येथे कंत्राटी बेसवर ड्रायव्हर होता. मात्र तो अनेक दिवसापासुन विवंचनेत होता. रविवारी दु. दोन वाजण्याच्या सुमारास घराच्या छतावर मोबाईलवर बोलत होता. कालांतराने खाली उतरून घराचा दरवाजा बंद करून दोर बांधून स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. आई जेव्हा दुपारी संक्रांतीचे वान घेवून घरी परतली तेव्हा तिला संदीपने गळफास लावल्याचे दिसले. 

घटनास्थळी पोलिस चार वाजण्याच्या सुमारास पोहचले. पोलिसांनी पंचनामा करून मृताचे प्रेत शव विच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविले आहे. पोलिसांनी संदीपचा मोबाइल जप्त केला असून मृत संदीपचा आजच जन्मदिवस होता. मात्र मृतकांच्या आत्महत्येवर संशय व्यक्त केला आहे. पुढील तपास चिमूर पोलीस करत आहे.

Web Title: on the day of her birth he was hanged