खापरखेडा वीज केंद्रात आढळला मृतदेह

file photo
file photo

खापरखेडा/कामठी : वीज केंद्राच्या कोळसा हाताळणी विभागाजवळ एका व्यक्तीचा शनिवारी दुपारी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. रामदास राजेश देवागन (वय 40, रा. अब्दुल्ला दर्गा, कामठी) असे मृताचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रामदास गुरुवारपासून (ता. 15) बेपत्ता होता. त्याचे कुटुंबीय त्याच्या शोधात होते. तो खापरखेडा येथे जात असल्याचे सांगून गेल्याने त्याचा शोध घेण्यासाठी त्याची पत्नी व इतर नातेवाईक खापरखेडा येथे आले. येथे एका बारच्या बाजूला गल्लीत त्याची दुचाकी दिसली. लगतच रेल्वेमार्ग असल्याने तिकडे शोध घेतल्यावर वीज केंद्राच्या भिंतीलगत मृत रामदासची चप्पल व सामान आढळून आले. कुटुंबातील सदस्यांनी भिंतीच्या पलीकडे पाहिल्यावर रामदासचा मृतदेह दिसला. मागील दोन दिवसांपासून वीज केंद्राच्या आत मृतदेह पडून होता. मृत रामदास हा सुरक्षा भिंत ओलांडून पलीकडे गेल्यानेही वीज केंद्राच्या सुरक्षेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण होत आहे.रामदासचा भंगारविक्रीचा व्यवसाय होता. कामठी पोलिसात त्याच्यावर विविध गुन्हे दाखल असल्याची माहिती मिळाली आहे. त्या ठिकाणावरून रामदासने उडी मारली तेथे नाला असल्याने सर्पदंश किंवा नाल्यात पडून गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असाही अंदाज लावला जात आहे. शवविच्छेदनानंतर मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com