भल्या पहाटे तलावाच्या काठावर दिसले भलतेच; बारकाईने बघितले असता ​उडाली एकच धावपळ

Dead fish found in Ramala lake in Chandrapur
Dead fish found in Ramala lake in Chandrapur

चंद्रपूर : शहरातील गोंडकालीन रामाळा तलावातील वाढत्या प्रदुषणामुळे मासे मृत पावत असल्याची घटना समोर आली आहे. इको-प्रो संघटनेने याची प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार केली आहे.

बुधवारी सकाळी इको-प्रोचे सदस्य रामाळा तलावाच्या काठावर होते. तेव्हाच सभोवताली मृत मासे तरंगताना आढळून आले. इको-प्रो सदस्यांनी तलावात उतरून पाहणी केली. काठावरील कचरा आणि इकॉर्निआ वनस्पतीखाली असल्याने बरेच मृत मासे दिसून येत नव्हते. जवळून बघताच तलावात मासे तरंगताना दिसत होते.

गेल्या काही दिवसांपासून मासे मृत होत असल्याचे दिसून येत आहे. फक्त विसर्जन स्थळावर पाहणी केल्यानंतर बरीच मासे मृत दिसली. तलावात येणारे सांडपाणी जे मच्छीनालाच्या माध्यमाने तलावात येते. त्यामुळे तलावाच्या प्रदूषणात वाढ होऊन जलजिवांना धोकादायक ठरत आहे. इको-प्रो सातत्याने तलावाच्या प्रदूषणाकडे लक्ष वेधले आहे.

मागीलवर्षी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. कुणाल खेमणार यांनी तलाव खोलीकरणबाबत बैठका घेतल्या होत्या. त्यात इको-प्रो तलाव संवर्धनासाठी सुचविल्याप्रमाणे तलाव सुकवून खोलीकरण करणे, अतिक्रमण रोखण्यास सुरक्षा भिंत बांधणे, मच्छीनाला वळती करणे, नाल्यावर जल शुद्धीकरण संयंत्र उभारणे, तलावात वेकोलिचे वाया जाणारे पाणी पाईपलाईन टाकून तलावात शुद्ध पाणी आणणे यावर चर्चा झाली होती.

यानुसार वेकोलिचे पाणी तलावात आणण्याचे काम करण्यात येत आहे. खोलीकरणास सुरुवात करण्यात आली. मात्र, पावसाला सुरुवात झाल्याने प्रत्यक्ष कामाची सुरुवात होऊ शकली नाही. इको-प्रो संस्था आता रामाळा तलाव प्रदुषणमुक्तीच्या मागणीसाठी आक्रमक झाली आहे. बुधवारी मृत मासे पकडून सेव रामाळा तलावाचे फलक घेऊन निदर्शने केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com