एक वर्षीय वाघाचा बछडा जखमी अवस्थेत आढळला, वरिष्ठ अधिकारी येईपर्यंत...

dead tiger was found in Chandrapur district
dead tiger was found in Chandrapur district

गोंडपिपरी (जि. चंद्रपूर) : कोठारी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या बामणी येथील एका शेतात पट्टेदार वाघाचा बछडा मृतावस्थेत आढळून आला. शुक्रवारी (ता. 12) सकाळी हा प्रकार समोर आला. या माहितीनंतर वनविभागात प्रचंड खळबळ माजली होती. वनविभागाचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. गेल्या चार माहिन्यांत या परिसरात अशापद्धतीने तीन वाघांचा जीव गेल्याची माहिती आहे. 

कोठारी वनपरिक्षेत्रातील बामनी गावातील पुंडलीक मडावी यांच्या शेतात पट्टेदार वाघ साधारण एक वर्षाच बछडा जखमी अवस्थेत आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सकाळी साधारण नऊ वाजताच्या सुमारास पुंडलीक मडावी नेहमीप्रमाणे आपल्या शेतात भाजीपाला पिकाची पाहणी करण्यासाठी गेले असता वांग्याच्या पिकात वाघाचा बछडा जखमी अवस्थेत पडून असल्याचे दिसले.

त्यांनी घाबरून गावात धूम ठोकली आणि गावकऱ्यांना माहिती दिली. गावातील लोक जमा होऊन वाघाला पाहण्यासाठी गर्दी करीत होते. काही गावकऱ्यांनी जवळ जाऊन बघितले असता वाघाचा बछडा गंभीर जखमी अवस्थेत दिसला. यानंतर गावकऱ्यांनी भ्रमणध्वनीद्वारे वनरक्षक टेकाम यांना माहिती दिली. घटनास्थळी चंद्रपूर वनवृत्तचे मुख्य वनसंरक्षक एस. व्ही. रामा राव, डीएफओ गजेंद्र हिरे, आरएफओ संदीप लंगडे, आरएफओ दिलीप बावणे यांच्यासह अनेक वनकर्मचारी उपस्थित होते. 

वरिष्ठ अधिकारी पोहोचेपर्यंत मृत्यू

माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन वाघाच्या बछड्यावर जाळी टाकून संरक्षण दिले आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. वरिष्ठ अधिकारी पोहोचेपर्यंत वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाला. यानंतर वनअधिकाऱ्यांनी बछड्याला आपल्या ताब्यात घेऊन शवविच्छेदन करण्यासाठी नेले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com