शववाहिकाच ठरली काळ; चंद्रपुरात दोघांचा मृत्यू, तिघे गंभीर 

van
van

चंद्रपूर : जिल्हा सामान्य रुग्णालयात मृतदेह घेऊन येणाऱ्या एका खासगी व्हॅनने रुग्णालय परिसरातच पाच जणांना चिरडले. यात एक महिला जागीच ठार, तर दुसऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला असून तीनजण गंभीर जखमी आहेत. पोलिसांनी व्हॅनचालक दिनेश बांबोडे याला अटक केली आहे. 

मृतदेह रुग्णालयात आणला 
शहरातील गोपालपुरी येथे राहणाऱ्या ललिता नामक वृद्ध महिलेने सोमवारी (ता. 18) आजाराला कंटाळून विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. मृतदेह विहिरीतून बाहेर काढल्यानंतर एका खासगी व्हॅनने मंगळवारी सकाळी सहा वाजताच्या सुमारास शवविच्छेदनासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात आणला. 

अरुंद मार्गाने नेले वाहन 
मृतदेह शवविच्छेदनगृहात नेल्यानंतर चालक दिनेश बांबोडे याने व्हॅन सुरू करून परत जाण्यास निघाला. त्यावेळी रुग्णालयात सकाळी लोकांची वर्दळ होती. दिनेशने मोठ्या मार्गाने वाहन न नेता अडचणीच्या जागेतून नेले. त्यात व्हॅनने पाच जणांना चिरडले. यात मुमताज शेख (वय 70, रा. चंद्रपूर) या महिलेचा जागीच मृत्यू झाला; तर राजेंद्र कामडी, सुधीर गराणे, मीरा उपरे, शकिला पठाण गंभीर जखमी झाले. 

वाहनचालकाला अटक 
घटनेनंतर नागरिकांनी चालक दिनेशला बेदम मारहाण केली. त्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. दिनेशने मद्य प्राशन केल्याचे सांगण्यात येत आहे. जखमी राजेंद्र कामडी, सुधीर गराणे, मीरा उपरे, शकिला पठाण यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. दुपारच्या सुमारास सुधीर गराणे (वय 70, रा. मुलचेरा, जि. गडचिरोली) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com