अकोला जिल्ह्यात दोन शाळकरी मुलांचा खदानीत बुडून मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

बोरगावमंजू (जि. अकोला) : बोरगावमंजू पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोळंबी व दुधलम रस्त्यालगत असेलल्या खदानीत बुडून दोन शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी (ता.२८) सायंकाळी उघडकीस आली. गौरव वाहुरवाघ व संघर्ष चक्रनारायण असे शाळकरी मुलांची नावे आहेत. अवघ्या १० ते १२ वर्षांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

बोरगावमंजू (जि. अकोला) : बोरगावमंजू पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या कोळंबी व दुधलम रस्त्यालगत असेलल्या खदानीत बुडून दोन शाळकरी मुलाचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरुवारी (ता.२८) सायंकाळी उघडकीस आली. गौरव वाहुरवाघ व संघर्ष चक्रनारायण असे शाळकरी मुलांची नावे आहेत. अवघ्या १० ते १२ वर्षांच्या दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.

गौरव सत्यवान वाहुरवाघ व संघर्ष सुभाष चक्रनारायण हे दाळंबी येथील रहिवासी आहेत. हे दोघे कोळंबी येथील शंकर विद्यालय येथे शिकत होते. गुरुवारी दोघेही जण दुपारी जेवणाच्या सुट्टीत शाळेतून बाहेर पडले होते. मात्र, सायंकाळपर्यंत दोन्ही मुले घरी न आल्याने त्यामुळे मुलांच्या पालकांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. दरम्यान, ते दोघे कोळंबी येथील गावालगत दुधलम रस्त्यावर येत असलेल्या खदानीत पोहण्यासाठी गेले असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार त्यांचे पालक व गावकरी शोध घेण्यासाठी खदानीजवळ गेले. मुलांचे कपडे व चपला काठावर मिळाल्याने त्यांना संशय आला.

गाडगेबाबा आपातकालीन पथकाची मदत
या घटनेची माहिती गाडगे बाबा आपातकालीन पथकाचे प्रमुख दीपक सदाफळे यांना दिली. पथकाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत पाण्यात मुलांचा शोध घेण्यास सुरुवात केली. अवघ्या काही वेळातच दोघांचे मृतदेह हाती लागले. याप्रकरणी बोरगावमंजू पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून, अधिक तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी घटनास्थळी भेट दिली.

पालकांचा आक्रोश
मुलांच्या मृत्यूची माहिती मिळताच पालकांनी काेळंबीला धाव घेतली. मुलाचा मृतदेह पाहताच त्यांनी आक्रोश केला. दोन्ही मुलांचे वडील हातमजूरी करतात. आमदार हरीश पिंपळे यांनी त्यांचे सांत्वन केले.

शाळेवर दिरंगाईचा आराेप
शाळेच्या हलगर्जीपणामुळे दोन्ही मुलांचा मृत्यू झाल्याचा आरोप पालकांनी केला अाहे. मुलांचे शाळेचे दप्तर तसेच त्यांचे वस्तू शाळेत असून, शिक्षक शाळा बंद करून घरी जातात कसे? मूल शाळेत आहे की नाही यांची माहितीसुद्धा त्यांना राहत नाही, त्यामुळेच आमच्या मुलांचा मृत्यू झाला असून, संबंधित अधिकारी व शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

Web Title: death of 2 boys in akola district