राष्ट्रसंतांच्या पुण्यतिथी महोत्सवाला प्रारंभ

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

तिवसाः राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या ५२ व्या पुण्यतिथी महोत्सवाला गुरुकुंज मोझरी येथे प्रारंभ झाला. गुरुदेव सेवा मंडळाचे सर्व अधिकारी प्रकाश महाराज वाघ यांच्या हस्ते तीर्थस्थापना चरण पादुका पूजन व राष्ट्रसंतांच्या समाधी अभिषेकाने गुरू देवाच्या प्रार्थनेच्या ओढीने सुरुवात झाली, यावेळी समाधीस्थळी मोजक्‍या गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीमध्ये पहाटे साडेचार वाजता चरण पादुका पूजन कार्यक्रम पार पडला.

महोत्सवाला यावर्षी सुरुवात झाली असून येत्या पाच नोव्हेंबरला दुपारी ४:५८ मिनिटांनी तुकडोजी महाराजांना श्रद्धांजली वाहिली जाईल. तर यंदा या पुण्यतिथी महोत्सला गर्दी न करण्याचे आवाहन संस्थानच्या वतीने करण्यात आले आहे. आज प्रार्थना मंदिराच्या परिसरात श्री वाघ महाराज यांनी सामूहिक ध्यानाच्या महत्त्वावर चिंतन प्रस्तुत केले व अष्टांग योगता, यंम, नियम, आसन, प्राणायाम, सांगितले. सर्वसाधारण माणसाला ध्यान ही कठीण बाब आहे असे वाटते, मात्र राष्ट्रसंतांनी ज्ञानाला सामुदायिक रूप प्राप्त करून साधनेचे सामुदायिकरण केल्याचे प्रकाश महाराज वाघ यांनी सांगितले, यावेळी उपसर्वअधिकारी लक्ष्मण गमे, सरचिटणीस जनार्दन बोथे, प्रचार प्रमुख दामोदर पाटील, डॉ. राजाराम बोथे, विलास साबळे, संजय तायडे, आधी उपस्थित होते.

तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवाला दरवर्षी लाखो गुरुदेव भक्त उपस्थिती दर्शवितात, परंतु यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने घालून दिलेल्या अटी शर्तींवर हा पुण्यतिथी महोत्सव मोजक्‍याच गुरुदेव भक्तांच्या उपस्थितीत पार पडणार आहे. आजपासून सुरू झालेल्या या महोत्सवात धार्मिक, सामाजिक आदि कार्यक्रम पार पडणार आहेत. या कार्यक्रमाला गर्दी टाळण्यासाठी पुण्यतिथी महोत्सवाचे थेट प्रसारण सोशल मीडियाच्या माध्यमातून रोज होणारे कार्यक्रम लाइव्ह करण्यात येणार आहेत. तर महोत्सवाचा समारोप हा येत्या सात तारखेला महाकाल्याने होईल.

संपादन - नरेश शेळके

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com