वीज पडून दोघांचा मृत्यू

file photo
file photo

नागपूर : शुक्रवारी आलेल्या वादळी पावसासह वीज पडून दोघांचा मृत्यू झाल्याची घटना चंद्रपूर, अमरावती जिल्ह्यांत घडली. चंद्रपूर जिल्ह्यात वरोरा तालुक्‍यात महिलेचा; तर अमरावती जिल्ह्यात धोतरखेडा येथे युवकाचा समावेश आहे.
वरोरा (जि. चंद्रपूर) : शेतातून घराकडे जात असताना वीज पडून महिला ठार झाली. ही घटना गुरुवारी (ता. 18) सायंकाळच्या सुमारास घडली. मंगला राजू कामडी (वय 25) असे मृत महिलेचे नाव आहे. तालुक्‍यातील शेगाव येथील मंगला कामडी या सकाळी शेतावर गेल्या होत्या. सायंकाळच्या सुमारास काम आटोपून त्या घराकडे येत होत्या. त्यावेळी विजेच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. त्यादरम्यान वीज पडून त्यांचा मृत्यू झाला.
परतवाडा (जि. अमरावती) : शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या धोतरखेडा येथे शुक्रवारी (ता. 19) दुपारी वादळवाऱ्यासह पाऊस आला. दरम्यान, वीज पडून एकाचा मृत्यू झाला. परतवाडा, अचलपूर या जुळ्या शहरासह तालुक्‍यातील अनेक गावांत वादळवाऱ्यासह विजेच्या कडकडाटात आलेल्या पावसाने काही काळ वातावरणात गारवा निर्माण केला होता. धोतरखेडा येथील अनिल कोगदे यांच्या शेतात काम करणारा मंगल्या राजने पावसापासून स्वतःचा बचाव करण्याकरिता शेतातील निंबाच्या झाडाचा आश्रय घेतला. मात्र, अचानक वीज पडल्याने त्याचा मृत्यू झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com