उष्माघाताने दोघांचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 10 जून 2019

अमरावती/वर्धा : उन्हाचा पारा वाढत असून उकाड्याने नागरिकांना त्रस्त करून सोडले आहे. अशातच उष्माघाताने वृद्धासह दोघांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी (ता. 10) अमरावती, वर्धा जिल्ह्यात घडली.
तिवसा (अमरावती) : गुरुकुंज मोझरी येथील जुन्या बसस्थानकात 79 वर्षीय वृद्धाचा उष्माघाताने मृत्यू झाला. सोमवारी (ता. 10) सकाळी 11 वाजताच्या सुमारास ही घटना समोर आली. महादेव नत्थूजी जवंजाळ (वय 79, रा. मोझरी) असे मृत वृद्धाचे नाव आहे.

सोमवारी सकाळी वृद्ध काही नागरिकांना जुन्या बसस्थानकात झोपलेल्या अवस्थेत पडून दिसला. त्यामुळे संशय बळावताच पाहणी केली असता तो मृत असल्याचे दिसून आले. जुन्या बसस्थानकात अधूनमधून तो थांबत होता.
समुद्रपूर (जि. वर्धा) : मामाचा अंत्यसंस्कार आटोपून परत आलेल्या भाच्याचा उष्माघाताने मृत्य झाल्याची घटना सोमवारी (ता. 10) सायंकाळी उघडकीस आली. उमेश ऊर्फ हरीश खोब्रागडे (वय 30) रा. समुद्रपूर, असे मृताचे नाव आहे. रविवारी (ता. 9) चेतन रामकृष्ण गजभिये या तरुणाचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. सोमवारी दुपारी त्याचा भाचा स्थानिक समुद्रपूरमध्येच त्यांच्या अंत्यसंस्कारात सहभागी झाला होता. दुपारनंतर अस्वस्थ वाटत असल्याने हरीश आपल्या राहत्या घरी जाऊन झोपला होता. संध्याकाळी लहान भावाने घरी जाऊन पाहले असता उमेश हा अत्यवस्थ दिसून आला. त्याला त्वरित समुद्रपूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; परंतु काही वेळातच त्याची प्राणज्योत मालविली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The death of both victims of sunstroke