नववधूसह तिघांचा अपघातात मृत्यू

मारेगाव : अपघातग्रस्त प्रवासी वाहन.
मारेगाव : अपघातग्रस्त प्रवासी वाहन.

मारेगाव (जि. यवतमाळ) : नवदाम्पत्यासह चंद्रपूर येथे महाकालीच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या वाहनाला परतताना भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यात नववधूसह तिघांचा मृत्यू झाला; तर एक मुलगी गंभीर जखमी आहे. ही घटना सोमवारी मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास मारेगावजवळील बिअरबारसमोर घडली.
हिंगोली जिल्ह्यातील बाळापूर येथील देवीदास भारत उपरे यांचा विवाह 24 एप्रिल रोजी साक्षीसोबत झाला होता. लग्नानंतर चंद्रपूर येथील महाकाली देवीच्या दर्शनाला नवदाम्पत्य आणि कुटुंबातील सदस्य वाहनाने गेले होते. वाहनात चालकासह 13 प्रवासी होते. सोमवारी (ता. 29) सर्वजण गावी परत जात होते. रात्री दीड वाजताच्या सुमारास त्यांचे वाहन मारेगावजवळ असताना तेथील एका बिअरबारजवळ विरुद्ध दिशेने आलेल्या ट्रकने त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली. यात प्रवासी वाहन तीनवेळा उलटले. वाहनातून प्रवाशांना बाहेर निघतादेखील येत नव्हते. त्यामुळे ट्रकचालकाने काच फोडून जखमींना बाहेर काढले.
अपघातात सासू लक्ष्मी भारत उपरे (वय 60) आणि सानिका किसन भोपाडे (वय 14) यांचा जागीच मृत्यू झाला, तर नववधू साक्षी देवीदास उपरे (वय 18) हिचा नागपूर येथे उपचारासाठी नेताना वाटेत मृत्यू झाला. राजनंदिनी सुनील पवार गंभीर जखमी आहे. जखमींवर वणी, मारेगाव आणि चंद्रपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com