कार अपघातात सख्ख्या भावांचा मृत्यू

 नागपूर : अपघात ग्रस्त कार
नागपूर : अपघात ग्रस्त कार

मेटपांजरा (नागपूर) : भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने झालेल्या अपघातात सख्ख्या भावांचा मृत्यू तर सहा जण जखमी झाले. ही घटना काटोल-नागपूर मार्गावरील हातला शिवारात रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. फुंकेश व संकेत चंदू पाटील अशी मृतांची नावे आहेत.
काटोल पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्‍यातील कुकडीपांजरा येथील मधुबन रिसॉर्टमध्ये एका पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. यासाठी फुंकेश (वय 25) व संकेत (वय 21, रा. विश्‍वकर्मानगर, नागपूर) यांच्यासह त्याचे सहा मित्र असे एकूण आठ जण कारने नागपूरकडून कुकरीपांजऱ्याकडे जात होते. हातला शिवारातून भरधाव वेगाने जात असताना कारवरील नियंत्रण सुटल्याने कार तीन चार पलट्या मारून रस्त्याच्या कडेवरील झाडावर आदळली. यात फुंकेश व संकेतचा जागीच मृत्यू झाला. तर इतर सहा जण गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती प्रत्यक्षदर्शींनी काटोल पोलिसांना दिली. जखमींना काटोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सर्व जखमींना पुढील उपचारासाठी नागपूर येथे पाठविण्यात आले आहे. या प्रकरणी काटोल पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. पुढील तपास काटोल पोलिस करीत आहेत. वृत्त लिहिस्तोवर जखमींची नावे मिळाली नव्हती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com