सुरक्षाभिंतीच्या ग्रीलमध्ये अडकून हरणाचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 14 जुलै 2019

पथ्रोट (जि. अमरावती) ः येथील गजानननगरमधील एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घराच्या सुरक्षाभिंतीवर असलेल्या ग्रीलमध्ये अडकून हरणाचा मृत्यू झाला. रविवारी (ता. 14) सकाळी ही घटना उघडकीस आली.

पथ्रोट (जि. अमरावती) ः येथील गजानननगरमधील एका सेवानिवृत्त शिक्षकाच्या घराच्या सुरक्षाभिंतीवर असलेल्या ग्रीलमध्ये अडकून हरणाचा मृत्यू झाला. रविवारी (ता. 14) सकाळी ही घटना उघडकीस आली.
ग्रामपंचायतसमोर निवृत्त शिक्षक ए. आर. देशमुख यांचे घर आहे. रात्रीच्या सुमारास पाण्याच्या शोधात हे हरिण आले असावे, त्याच्या मागे मोकाट कुत्री लागल्यामुळे ते हरिण मानवी वस्तीत घुसले. अचानक घराच्या अंगणात आले, तेथून निघण्याच्या प्रयत्नात ते सुरक्षाभिंतीच्या लोखंडी ग्रीलमध्ये अडकले. ग्रिलच्या लोखंडी सळ्या पोटात घुसल्याने त्याला निघता आले नाही. अखेर तडफडत या हरणाचा मृत्यू झाल्याचे निदर्शनात आले. सकाळी घटनेबाबत कळताच परिसरातील नागरिकांनी श्री. देशमुख यांच्या निवासस्थानाकडे धाव घेतली. घटनेची माहिती वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a deer attached to the security wall grill