शेवतीत रखवालदाराचा विहिरीत बुडून मृत्यू

file photo
file photo

अमरावती :  पाणी काढताना पाय घसरून विहिरीत पडल्याने रखवालदाराचा बुडून मृत्यू झाला. रविवारी (ता. सहा) सकाळी ही घटना उघडकीस आली. रामपाल चोच्चे भुसूमकर (वय 42, रा. बोडाई, जि. बैतुल, मध्यप्रदेश) असे मृत रखवालदाराचे नाव आहे. शनिवारी (ता. पाच) रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. नांदगावपेठ येथील असीद खान यांचे शेवती गावात शेत असून, तेथे अनेक दिवसांपासून रामपाल हा रखवालदारीचे काम करून शेतातच राहायचा. शनिवारी रात्री तो पाणी काढण्यासाठी विहिरीजवळ गेला. पाणी काढताना अचानक पाय घसरून तोल गेल्याने तो बुडाला. ही बाब अन्य मजुरांच्या निदर्शनात आली. विहिरीला भरपूरपाणी होते. घटनास्थळी अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. मृतदेह विहिरीच्या एका कपारीत अडकला होता. त्यामुळे शोध व बचाव पथकालाही घटनास्थळी पाचारण केले. अखेर विहिरीमधून रामपालचा मृतदेह बाहेर काढला. नांदगावपेठ पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com