खड्ड्यात बुडून चिमुकल्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 30 जुलै 2019

दवलामेटी/वाडी : नागरिकांच्या मागणीवर ग्रामपंचायत परिसरातील सुरू झालेल्या स्वच्छतागृहाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून पाचवर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. आर्यन नवदीप राऊत असे मृत बालकाचे नाव आहे. तो सोमवारी सायंकाळी सहापासून बेपत्ता असल्याने त्याचा अपहरणाचा संशय व्यक्त केला जात होता.मिळालेल्या माहितीनुसार, दवलामेटी येथील रामजी नगर वस्तीमध्ये ऑटोचालक असलेले नवदीप राऊत हे पत्नी सारिका, मृत आर्यन व इतर दोन मुलांसह राहतात. सोमवारी आर्यन सायंकाळी सहा वाजता त्याच्या घरच्यांना खेळताना दिसला होता.

दवलामेटी/वाडी : नागरिकांच्या मागणीवर ग्रामपंचायत परिसरातील सुरू झालेल्या स्वच्छतागृहाच्या बांधकामासाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून पाचवर्षीय चिमुकल्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. आर्यन नवदीप राऊत असे मृत बालकाचे नाव आहे. तो सोमवारी सायंकाळी सहापासून बेपत्ता असल्याने त्याचा अपहरणाचा संशय व्यक्त केला जात होता.मिळालेल्या माहितीनुसार, दवलामेटी येथील रामजी नगर वस्तीमध्ये ऑटोचालक असलेले नवदीप राऊत हे पत्नी सारिका, मृत आर्यन व इतर दोन मुलांसह राहतात. सोमवारी आर्यन सायंकाळी सहा वाजता त्याच्या घरच्यांना खेळताना दिसला होता. रात्री आठ वाजेपर्यंत तो घरी परत न आल्याने त्याचा शोध सुरू झाला. दरम्यान, सोमवार बाजाराचा दिवस असल्याने बाजारातही त्याचा शोध घेत सर्व परिचितांना विचारपूस करण्यात आली. रात्री 11 पर्यंत शोध घेतल्यावरही तो सापडला नसल्याने अपहरणाचा संशय व्यक्त करीत वाडी पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनीदेखील याकडे गांभीर्याने लक्ष दिले. मंगळवारी सकाळी पुन्हा आर्यनचा शोध घेण्यात आला.दवलामेटी येथील काही सामाजिक संघटना व नागरिकांनी केलेल्या मागणीनुसार, दहा दिवसांपूर्वी समाजभवनाच्या आवारात स्वच्छतागृहाची निर्मिती करण्यासाठी खड्डा तयार केला आहे. पावसामुळे खड्ड्यात पाणी भरल्याने पुढील काम थांबले आहे. या खड्ड्यात आर्यनचा मृतदेह आढळून आला. वाडी पोलिसांना सूचना देण्यात आली. सरपंच-उपसरपंच शिर्डी येथे मेळाव्यासाठी गेल्याने ते या घटनेच्यावेळी हजर नव्हते. यामुळे या घटनेबद्दल नागरिकांत रोष आहे.काही दिवसांपूर्वी याच खड्ड्यात एक बालक बुडल्याची घटना घडली होती. त्यावेळी शेजारच्यांनी आरडाओरड केल्याने त्याचा जीव वाचला. मात्र, आर्यनबाबत तसे झाले नाही. घरापासून सुमारे 250 मीटर दूर व ग्रामपंचायतीच्या आवारातील खड्ड्याजवळ आर्यन कसा पोहचला, याविषयी वेगवेगळे तर्क लावले जात आहेत. ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे आर्यनचा मृत्यू झाल्याने ग्रामपंचायतीकडे मोबदल्याची मागणी केली आहे.

स्वछतागृहाचे बांधकाम करण्यासाठी खड्डा खोदण्यात आला आहे. ग्रामपंचायतीला व समाजभवनाला सुरक्षा भिंत आहे. पीडित परिवाराचे घर अंदाजे 300 मीटर दूर असताना मुलगा तिथे केव्हा व कसा गेला याचा शोध घेऊ.
- विष्णू पोटभरे, ग्रामविकास अधिकारी, दवलामेटी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death from drowning in a pit