वीज कोसळून आदिवासी शेतमजुराचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 31 ऑगस्ट 2019

अमरावती : शेतातून परत येत असताना आदिवासी मजुराचा वीज कोसळून जागीच मृत्यू झाला. शुक्रवारी (ता. 30) दुपारी अडीच ते तीनच्या सुमारास देवरी निपाणी गावात ही घटना घडली. गेंदलाल संतू तुमडाम (वय 26 रा. खेरआठवा, भैसदेही) असे मृत मजुराचे नाव आहे.
वलगाव पोलिसांनी याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद घेतली. मागील पंधरा दिवसांपासून देवरी निपाणी गावात काही आदिवासी मजूर कामासाठी आलेले आहेत. शेतात काम करून आपल्या राहूटीकडे परत जात असताना, पाऊस सुरू झाला, त्याचवेळी वीज गेंदलालच्या अंगावर कोसळल्याने त्याचा मृत्यू झाला, असे वलगाव पोलिसांनी सांगितले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of farm worker by lightning

टॅग्स