अमरावतीत शासकीय तंत्रनिकेतनच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

अमरावती : येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याचा गाडगेनगर भागातील पलाश लेनमध्ये भाड्याच्या खोलीत शुक्रवारी (ता. सहा) सकाळी मृतदेह आढळला.

अमरावती : येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात तिसऱ्या वर्षाच्या विद्यार्थ्याचा गाडगेनगर भागातील पलाश लेनमध्ये भाड्याच्या खोलीत शुक्रवारी (ता. सहा) सकाळी मृतदेह आढळला.
जयेश खुशाल शिरभाते (वय 18) असे मृताचे नाव असून तो चांदूररेल्वे येथील शिक्षक कॉलनीचा मूळ रहिवासी आहे. पलाश लेनमधील राजेश जेठासिंग चव्हाण यांच्याकडे तो एक महिन्यापासून भाड्याने खोली घेऊन राहत होता. चव्हाण यांच्या नातेसंबंधातील एक महिला उपचारार्थ दाखल असल्याने चव्हाण कुटुंब घरी नव्हते. चव्हाण शुक्रवारी सकाळी घरी परतले तेव्हा शेजारच्या खोलीत राहणाऱ्या मुलाने खोलीतून दुर्गंधी येत असल्याचे त्यांना सांगितले. त्या खोलीचे दार व खिडकी आतून बंद होती. खिडकी उघडून आत डोकावून बघितले असता जयेश मृतावस्थेत निपचित पडलेला होता. घटनेची माहिती त्याचे वडील खुशाल शिरभाते तसेच गाडगेनगर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविला. जयेशचा मृत्यू कशाने झाला, ही बाब वैद्यकीय अहवालातून स्पष्ट होणार आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a government politechnic student in Amravati

टॅग्स