विजेच्या धक्‍क्‍याने बिबट्यासह वानराचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 29 जुलै 2019

देसाईगंज (गडचिरोली) : झाडावरील वानराची शिकार करायला चढलेल्या बिबट्याचा व वानराचा वीजतारेला स्पर्श होऊन मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील कोरेगाव-एकलपूर मार्गावर असलेल्या नदीजवळील शेतशिवारात रविवारी (ता. 28) रात्रीच्या सुमारास घडली.

कोरेगाव-एकलपूर मार्गावर असलेल्या नदीजवळील शेतशिवारात रात्रीच्या सुमारास बिबट्याने आंब्याच्या झाडावर बसलेल्या वानरावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे वानराने झाडालगत असलेल्या वीजतारेवर उडी मारली. त्यापाठोपाठ बिबट्यानेही उडी मारल्याने वीजतारेचा स्पर्श होताच दोघांचाही मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. उपवनसंरक्षक विवरेकर, सहाय्यक वनसंरक्षक कांबळे, देसाईगंजचे वनपरिक्षेत्राधिकारी राहुल शिंदे व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला. बिबट व वानराचा मृतदेह वडसा वनविभागामध्ये आणण्यात आला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a monkey with lightning struck

टॅग्स