मुलाच्या मारहाणीत आईचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 25 मे 2017

नागपूर - निराधार योजनेअंतर्गत मिळालेल्या पेन्शनचे दोन हजार रुपये न दिल्यामुळे दारुड्या मुलाने वृद्ध आईला जबर मारहाण केली. या मारहाणीत वृद्धेचा मृत्यू झाला. ही  हृदयद्रावक घटना रविवारी रात्रीच्या सुमारास अजनीतील सावत्रीबाई फुलेनगरात घडली. या प्रकरणी बहिणीच्या तक्रारीवरून अजनी पोलिसानी मुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला. कमलाबाई मुकुंदराव रामटेके (वय ८५) असे खून झालेल्या वृद्धेचे नाव आहे. तर, किशोर मुकुंदराव रामटेके (वय ५८) असे आरोपी मुलाचे नाव आहे. त्याला पोलिसांनी अटक केली असून त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर रामटेके हा सायकल रिक्षाचालक आहे. त्याला दारूचे व्यसन असल्यामुळे पत्नी व मुलगा त्याला सोडून दुसरीकडे राहतात. त्यामुळे तो आई कमलाबाई यांच्यासोबत राहत होता. त्यांचे वडिलोपार्जित घर आहे. कमलाबाईला शासनाच्या वतीने देण्यात येणारी निराधार योजनेअंतर्गत पेन्शन मिळते. गेल्या दोन दिवसांपूर्वी पेन्शनचे पैसे मिळाल्यानंतर किशोरने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. मात्र, कमलाबाईने पैस न देता घरात अन्नधान्य आणि किराणा भरला. उर्वरित पैसे मागण्यासाठी त्याचा तगादा सुरू होता. किशोर आणि कमलाबाई यांच्यात वाद झाला. रविवारी रात्री दहा वाजता किशोर हा दारू पिऊन घरी आला. त्याने आईशी पैसे मागण्यावरून वाद घातला. किशोरने आईला जबर मारहाण केली. या मारहाणीत कमलाबाई गंभीर जखमी झाल्या. 

मात्र, किशोरने त्यांना उपचारासाठी कुठेही नेले नाही. रात्रभर कन्हत असताना कमलाबाई यांनी प्राण सोडला. ही घटना सकाळी झोपेतून उठल्यानंतर उघडकीस आली. मात्र, आईचा वृद्धापकाळाने मृत्यू झाल्याची बोंब ठोकत अंत्यसंस्काराची घाई केली. मात्र, काही सतर्क नागरिकांनी पोलिसांना माहिती दिल्यामुळे हा प्रकार उघडकीस आली. या प्रकरणी अजनीचे पोलिस उपनिरीक्षक योगेश इंगळे यांनी गुन्हा दाखल करून आरोपी किशोरला अटक केली. 

... तर वाचला असता जीव
रविवारी रात्री दहा वाजता किशोर हा आईला शिवीगाळ करीत होता. त्यावेळी शेजारी राहणाऱ्या युवकाने अजनी पोलिसांना फोनवरून माहिती दिली. त्यानंतर अजनी ठाण्यातून एक कर्मचारी  आला आणि तो समजूत घालून निघून गेला. किशोर अत्याधिक दारूच्या नशेत होता, त्याला जर ताब्यात घेतले असते किंवा ठाण्यात नेऊन बसवले असते तर कमलाबाईचा जीव वाचला असता.

असा झाला उलगडा
दारूच्या नशेत आई कमलाबाईला जबर मारहाण केली. यामध्ये वृद्धेचे दोन्ही हाताचे ढोपर फुटले तर डोक्‍यातूनही भळाभळा रक्‍त वाहत होते. जखमी कमलाबाईचा मृतदेहच सकाळी किशोरला दिसला. त्यावेळी रिक्षामालक घरी आला. त्याला हा प्रकार दिसल्यानंतर त्याने शेजाऱ्यांना  सांगितले. त्यावेळी किशोर अंत्यसंस्काराची तयारी करीत होता. मात्र, शेजाऱ्यांनी पोलिसांना बोलावून प्रकरणाचा उलगडा केला.

Web Title: The death of the mother in the death of a child