मुलाने काळजावर दगड ठेवला अन् पेपर देऊन वडिलांच्या अंत्यविधीसाठी पोहोचला

Death of father
Death of fatherDeath of father

साकोली (जि. भंडारा) : गुरुवारी बारावीचा मराठीचा शेवटचा पेपर होता. मध्यंतरी परीक्षेच्या वेळापत्रकात सुटी असल्याने ‘तो’ गावी गेला. आज शेवटचा पेपर देण्यासाठी तो आई-वडिलांचा निरोप घेऊन निघाला. मात्र, रात्री ११ वाजताच्या सुमारास त्याच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतल्याचा निरोप त्याला मिळाला. वडिलांचे पार्थिव घरी असताना त्याने काळजावर दगड ठेवला अन् पेपर देऊनच अंत्यविधीसाठी गावाला परतला.

प्रणित सुभाष कऱ्हाडे हा साकोली येथील कृष्णमुरारी कटकवार विद्यालयातील बारावीचा विद्यार्थी आहे. तो मूळचा देवरी तालुक्यातील चिचगड जवळचा रहिवासी आहे. परीक्षा सुरू असतानाच त्याच्या वडिलांची प्रकृती बिघडली होती. पेपरला सुटी असल्याने तो गावाला आला होता. या काळात त्याने वडिलांना गोंदियाला नेले व त्यांच्यावर उपचार केले होते.

Death of father
रशियाला दणका : मानवाधिकार परिषदेतून केले निलंबित; भारतानं मतदान टाळलं

दोन दिवसांनंतर त्यांना धोका नसल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यामुळे प्रणित त्यांना घेऊन घरी गेला. आज शेवटचा पेपर असल्याने तो आई-वडिलांचा निरोप घेऊन काल रात्रीच साकोलीला परतला होता. मात्र, रात्रीच त्याच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतल्याची बातमी त्याला मिळाली. शोकाकुल अवस्थेतही प्रविणने अगोदर मराठीचा पेपर देण्याचा व नंतरच गावी जाण्याचा निर्णय घेतला. तो पेपर सोडवून गावात परत येईस्तोवर वडिलांचे पार्थिव घरीच होते. अंत्यसंस्कारासाठी आलेले सर्व नातेवाईक त्याची वाट पाहत होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com