रोहित्रीच्या विद्युत झटक्याने व्यक्तीचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 जुलै 2018

सुकनेगाव येथील शेतातील विद्युत रोहित्राचे काम करत असताना लागलेल्या विद्युत झटक्याने 36 वर्षीय खाजगी लाइनमनाचा मृत्यू झाल्याची घटना ता. 24 जुलैच्या सकाळी घडली.

वणी(यवतमाळ)- तालुक्यातील सुकनेगाव येथील शेतातील विद्युत रोहित्राचे काम करत असताना लागलेल्या विद्युत झटक्याने 36 वर्षीय खाजगी लाइनमनाचा मृत्यू झाल्याची घटना ता. 24 जुलैच्या सकाळी घडली.

ग्रामीण भागात सतत वीज पुरवठा खंडित होत असतो विजवितरण कंपनीला तक्रार करूनही वीज पुरवठा सुरळीत होत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना अनेक संकटाचा सामना करावा लागतो आणि तेव्हा शेतकरी खाजगी लाईनमनचा आधार घेतो. सुकनेगाव येथील अशोक उईके हा तरुण खाजगी लाईनमनचे काम करतो.

विठ्ठल राजूरकर व सतीश लांडे यांच्या शेतात असलेल्या विजवितरण कंपनीच्या रोहित्रावर विजेचे काम करण्याकरिता तो चढला असता त्याला जोरदार विजेचा झटका लागल्याने तो खाली पडला व त्याचा मृत्यू झाला. याबाबत वणी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली असून कोणाच्या सांगण्यावरून तो काम करीत होता याचा तपास चालू आहे.

Web Title: death of one person due to electrical shock