अकोल्यात मतदान केल्यानंतर एकाचा ह्दयविकाराने मृत्यू 

योगेश फरपट पाटील
मंगळवार, 21 फेब्रुवारी 2017

मृत्यूपुर्वी केले मतदान
गाेरक्षण राेडवरील मतदान केंद्रावर मतदान करून बाहेर पडलेल्या मतदाराचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना दुपारी १ वाजता घडली. या घटनेने परिसरात शाेककळा पसरली हाेती. 

अकाेला - महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी (ता.२१) मतदान घेण्यात येत आहे. दुपारी १२ वाजेपर्यंत शहरातील विविध मतदान केंद्रावर २० टक्के मतदान झाल्याची माहिती निवडणुक अधिकाऱ्यांनी दिली. शहरातील गाेरक्षण राेडवर मतदान केल्यानंतर घरी जाणाऱ्या मतदाराचा ह्दयविकाराने मृत्यू झाल्याची घटना दुपारी १ वाजता घडली. 

यंदाची महापालिका निवडणुक अटीतटीची ठरत आहे. मतदार राजा घराबाहेर निघण्यासाठी विलंब करतांना दिसत आहे. शहरातील ५८७ मतदान केंद्रावर निवडणुक प्रक्रिया पार पडत आहे. शहरातील एकुण २० प्रभागातील ५७९ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेट्यामध्ये सील हाेणार आहे. प्रशासनाने पहिल्यांदाच उमेदवारांची संपत्ती, गुन्ह्यांची माहितीचा लेखाजाेगा मतदान केंद्राबाहेर माहितीसाठी फलक लावलेले आहेत.

त्यामुळे बहुतांश मतदार ही माहिती पाहतांना दिसत आहे. महापालिकेच्या निवडणुकीसाठी भाजपचे ७२, कॉंग्रेस ६८, राष्ट्रवादी काँग्रेस ७३, भारिप बमसं ५७, शिवसेना ७१, मनसे १८, समाजवादी पार्टी १३, बसपा ०४, लाेजपा ०२, एमआयएम १४, आरपीआय ०२, संभाजी ब्रिगेड ०१, पीआरपी ०१, बमुप ०३, अविआ ०२, विविपा ०१, अपक्ष १७७ असे एकूण ५७९ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. सकाळी ७.३० वाजतापासून मतदान प्रक्रियेस सुरुवात झाली. पालकमंत्री डॉ. रणजित पाटील व जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी सपत्नीक मतदानाचा हक्क बजावला. आमदार गाेवर्धन शर्मा, भारिप बमसंचे राष्ट्रीय अध्यक्ष ऍ़ड. प्रकाश आंबेडकर, भाजपचे महानगराध्यक्ष किशाेर मांगटे पाटील, उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व विविध पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनाी मतदान केले. 

मृत्यूपुर्वी केले मतदान
गाेरक्षण राेडवरील मतदान केंद्रावर मतदान करून बाहेर पडलेल्या मतदाराचा ह्दयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना दुपारी १ वाजता घडली. या घटनेने परिसरात शाेककळा पसरली हाेती. 

जनजागृतीसाठी पुढाकार
‘मतदान हा अधिकार नसून राष्ट्रीय कर्तव्य आहे’ त्यामुळे प्रत्येकाने मतदान करायला पाहिजे, असे आवाहन करणारे फलक विविध सामाजीक संघटनांनी मतदान केंद्राबाहेर लावलेले हाेते. प्रामुख्याने विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी, विद्यार्थीनी नागरिकांना याबाबत माहिती देत हाेते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: death of one person heart attack after voting in Akola