esakal | मध्यरात्री विवाहितेला भेटायला गेला पोलिस; दुसऱ्या रूममध्ये असलेल्या पतीला मिळाली माहिती अन् झाला मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

The death of a policeman who went to meet his girlfriend

मात्र, मद्यप्राशन केल्यामुळे पोलिस शिपाई महेश डोगरवार याचा तोल गेला आणि तो खाली जमिनीवर कोसळला. डोक्याला मोठ्या प्रमाणावर दुखापत झाल्यामुळे अतिरक्तस्राव झाला आणि पोलिस शिपायाचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

मध्यरात्री विवाहितेला भेटायला गेला पोलिस; दुसऱ्या रूममध्ये असलेल्या पतीला मिळाली माहिती अन् झाला मृत्यू

sakal_logo
By
टीम ई सकाळ

भंडारा : जिल्ह्यातील गणेशपूर गावात मध्यरात्री विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी पोलिस शिपाई महेश डोगरवार गेला होता. मात्र, फ्लॅटवरच त्याचा मृत्यू झाल्याने पोलिस विभागात एकच खळबळ उडाली आहे. महेश याची हत्या झाली की, इमारतीतून उतरताना मृत्यू झाला याचा पोलिस तपास करीत आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवार मध्यरात्री पोलिस शिपाई महेश डोगरवार विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी फ्लॅटवर गेला होता. याची माहिती महिलेच्या पतीला मिळाली. प्रेयसीचा पती रूममध्ये येत असल्याचे पाहून पोलिस शिपायाने फ्लॅटच्या बालकनीतून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. बालकनीतून उतरत असताना तोल गेला आणि तो कोसळला. यातच त्याचा मृत्यू झाला.

अधिक माहितीसाठी - वाढदिवसाला नातेवाईक बसले जेवायला; बॉक्स उघडताच सरकली पायाखालची जमीन

रविवारी रात्रीच्या सुमारास पोलिस शिपाई विवाहित प्रेयसीला भेटण्यासाठी तिच्या फ्लॅटवर गेला होता. याची कल्पना घरातीलच दुसऱ्या रूममध्ये असलेल्या महिलेच्या पतीसह मुलांना आली. दरम्यान, पतीने यासंदर्भात पत्नीला विचारणा करण्याचा प्रयत्न केला असता मद्यप्राशन केलेल्या पोलिसाने अंतर्वस्त्रांवरच फ्लॅटच्या बालकनीचा वापर करून खाली उतरण्याचा प्रयत्न केला.

मात्र, मद्यप्राशन केल्यामुळे पोलिस शिपाई महेश डोगरवार याचा तोल गेला आणि तो खाली जमिनीवर कोसळला. डोक्याला मोठ्या प्रमाणावर दुखापत झाल्यामुळे अतिरक्तस्राव झाला आणि पोलिस शिपायाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. भंडारा शहर पोलिसांकडून या घटनेचा सखोल तपास सुरू आहे.

अधिक वाचा - माणुसकीला कळीमा! बाळाचा जन्म अन् पतीचा मृत्यू; बाळ अपशकुनी असल्याचे समजून केले भयानक कृत्य

महेशचा मृत्यू की हत्या?

महेशचा तोल गेल्याने मृत्यू झाला की हत्या करण्यात आली, याचा अधिक तपास पोलिस करीत आहे. महेश हा साकोली पोलिस ठाण्यात कार्यरत होता. ही घटना भंडारा शहराला लागून असलेल्या गणेशपूर येथे घडली. भंडारा शहर पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

loading image