निवडणूक कर्तव्यावरील शिक्षकाचा भोवळ येऊन पडल्याने मृत्यू 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

एटापल्ली (जि. गडचिरोली) : एटापल्ली तालुक्‍यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक बापू पांडु गावंडे (45) हे निवडणूक कर्तव्यावर पायी जात असताना भोवळ येऊन पडले. त्यांचा चंद्रपूर येथे उपचारा दरम्यान मृत्यू झाला. 

बापू गावंडे यांना मिरगीचा आजार होता. त्यांची विधानसभा निवडणुकीसाठी एटापल्ली तालुक्‍यातील पुरसलगोंदी येथील केंद्रावर नियुक्‍ती करण्यात आली होती. मतदान केंद्र पथक हेडरी बेस कॅम्पवरून पुरसलगोंदी केंद्राकडे पायी जात असताना गावंडे हे भोवळ येऊन पडले. त्यांच्या डोक्‍याला गंभीर मार लागल्याने ग्रामीण रुग्णालय एटापल्ली येथे उपचारार्थ दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना प्रथम अहेरी व तेथून चंद्रपूर येथे हलविण्यात आले. मात्र, त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. यापूर्वीही जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या कर्तव्यावरील शिक्षकाचा हृदय विकाराच्या झटक्‍याने मृत्यू झाला होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of teacher on election duty