गोंदिया : मृतावस्थेत आढळलेल्या वाघाची नखे आणि दात गायब

गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत रामघाट क्रमांक 1 बीट कक्ष क्रमांक 254 बी मध्ये वाघाच्या मृतदेह आढळला.
Tiger
TigerSakal
Summary

गोंदिया जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत रामघाट क्रमांक 1 बीट कक्ष क्रमांक 254 बी मध्ये वाघाच्या मृतदेह आढळला.

गोंदिया - जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातील अर्जुनी मोरगाव वनपरिक्षेत्र अंतर्गत रामघाट क्रमांक 1 बीट कक्ष क्रमांक 254 बी मध्ये वाघाच्या मृतदेह (Tiger Deathbody) आढळला असून, मृतक वाघाचे नख (Tiger Claw) आणि दात (Teeth) गायब (Missing) असल्याने मृतक वाघाची शिकार झाल्याचे प्राथमिक दृष्या आढळून आले आहे. त्यामुळे वन विभागाबरोबरच परिसरात एकच खळबळ माजली आहे.

Tiger
वर्धा गर्भपात प्रकरणाचा SITद्वारे होणार तपास - पोलीस अधीक्षक

आज सकाळी वनाधिकाऱ्यांद्वारे जंगलात पेट्रोलिंग सुरु असतांना संबधित घटना उघड़ झाली आहे. अर्जुनी मोरगाव पासून दहा किलोमीटर अंतरावर निलज गावालगत दोन किलोमीटर अंतरावर सदर घटना घडली असून, मृतक वाघाचे नख आणि दांत गायब असल्याने त्यांमुळे त्याची शिकार केल्याची प्राथमिक माहीति असून आरोपीनी शिकार कश्याप्रकारे केली, ह्या दृष्टिने तपास सुरु आहे. विशेष म्हणजे ह्या पूर्वी देखील शिकारीची घटना अशीच घडली असून घटना उजागर झाल्यानंतर अनेक आरोपी ला अटक झाली होती. मात्र, आजच्या घटनेनंतर ही वनविभागासमोर एक आव्हाहन उभे ठाकले असून वन विभागाद्वारे आरोपीच्या शोध सुरु आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com