ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू

bhivapur
bhivapur

नागपूर- गडचिरोली मार्गावरील भिवापूर येथे ट्रकच्या धडकेत विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी सकाळी 10 वाजताच्या सुमारास घडली.

घटनेनंतर संतप्त जमावाने तब्बल चार तास वाहतूक ठप्प केली. जमावाने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या नादुरुस्त खासगी बसला आग लावली. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांना लाठीमार व अश्रूधुराच्या कांड्या फोडाव्या लागल्या.


सुंगधा धनराज पिंपळकर (वय 17) हिचा जागीच मृत्यू झाला. तर ऐश्‍वर्या बडोली (वय 17) ही गंभीर जखमी असून तिला नागपूर येथे उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. शनिवारी सकाळी शाळेतून परत येत असताना जमशेदपूरहून बडोद्याला जाणाऱ्या ट्रकचे मार्गावरील गतीरोधकामुळे नियंत्रण बिघडल्याने अपघात झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
 


पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी पोहचले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांनी सौम्य लाठीहल्ला केला व चार अश्रुधुरांच्या नळकांड्या फोडल्या. भिवापूर शहर पूर्णत: बंद आहे. ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून भिवापूर शहरात तणावपूर्ण शांतता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com