पोहण्यासाठी गेलेल्या दोन मित्रांचा बुडून मृत्यू 

Two friend died in a pond
Two friend died in a pond

रिद्धपूर (जि. अमरावती) : स्थानिक गिट्टीखदान परिसरातील खोल खड्ड्यात साचलेल्या पाण्यात पोहण्यासाठी गेलेल्या दोन लहान मित्रांचा बुडून मृत्यू झाला. ही घटना आज, बुधवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास घडली. 
क्रिश सतीश पोहोकार (वय 13) व सुमित गुरू गंगाधर (वय 13) अशी मृत मुलांची नावे आहेत. दोघेही आठव्या वर्गात शिकत होते. प्रथम सत्राचा पेपर दिल्यानंतर ते दुपारी दोनच्या सुमारास घरी परत आले. जेवण करून दुपारी तीन वाजता पोहण्यासाठी खाणीकडे गेले. पोहता येत नसताना दोघांनीही खोल पाण्यात उड्या घेतल्या. घटनेच्या वेळी त्यांच्यासोबत असलेल्या इतर मित्रांनी आरडाओरड केल्यामुळे ग्रामस्थांसह आसपासच्या शेतात काम करणाऱ्यांनी मदतीसाठी खाणीच्या दिशेने धाव घेतली. अनेकांनी दोघांना वाचविण्यासाठी पाण्यात उड्या घेतल्या, मात्र त्यांचे प्रयत्न निष्फळ ठरले. शिरखेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com