बाळापूर येथे दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघांचा मृत्यू

अनिल दंदी
शुक्रवार, 11 मे 2018

अब्दूल अजीजने उतारावर ट्रॅक्टर उभा केल्यामुळे सदर ट्रॅक्टर सुरु झाला. तो बंद करण्यासाठी अब्दुल त्यावर चढला असताना ट्रॅक्टरच्या मागील चाकात आल्याने गंभीर जखमी झाला. त्याला लागलीच बाळापूरातील ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र तेथील डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अकोला - बाळापूर पोलिसांच्या हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघाताच्या घटनांमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. पहिली घटना सकाळच्या सुमारास बाळापूर शहरात घडली आहे. या घटनेत शहरातील कचरा उचलणाऱ्या ट्रॅक्टर चालकाचा ट्रॅक्टरच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला आहे.

अब्दुल अजीज असे ट्रॅक्टर चालकाचे नाव असून तो दररोज नगर परिषद बाळापूर अंतर्गत कचरा उचलण्याचे काम करतो. आज नेहमीप्रमाणे शहरातील लाल सवारी चौकात एम. एच. 30 एच. 102 या क्रमांकाच्या ट्रॅक्टर ट्राॅली मध्ये कचरा भरण्याचे काम सुरु होते. अब्दूल अजीजने उतारावर ट्रॅक्टर उभा केल्यामुळे सदर ट्रॅक्टर सुरु झाला. तो बंद करण्यासाठी अब्दुल त्यावर चढला असताना ट्रॅक्टरच्या मागील चाकात आल्याने गंभीर जखमी झाला.
त्याला लागलीच बाळापूरातील ग्रामीण रुग्णालयात हलविले. मात्र तेथील डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

दुसरी घटनेत भरधाव कंटेनरने दुचाकीस्वारास जबर धडक दिल्याने दुचाकी वरील उत्तम पुंडलिक इंगळे (रा. चिंचोली कारफार्मा) ता. शेगांव हा इसम जागीच ठार झाल्याची घटना वाडेगांव-बाळापूर मार्गावर तामशी फाट्यावर घडली.

हैद्राबादहून मुंबईला भरधाव जाणारे एच. आर. 55 एए. 2077 या क्रमांकाचे कंटेनर वाडेगांवकडे जात असलेल्या एम. एच. 28 एके. 286 या दुचाकीवर आदळले. यामध्ये उत्तम इंगळे यांचा जागीच मृत्यू झाला.

या घटनेतील अपघातास कारणीभूत असलेला कंटेनर पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना महामार्ग पोलिस मदत केंन्द्राच्या कर्मचाऱ्यांनी बाळापूर जवळ पकडला. मात्र चालक फरार झाला आहे.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: The death of two in two separate incidents in Balapur