अंगावर वीज कोसळून महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास शेतशिवारातून घराकडे परत येत असताना संगीता मडावी यांच्या अंगावर वीज पडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पती मात्र काही अंतरावर असल्याने ते बचावले. 

आष्टी (जि. गडचिरोली) : शेतात कापसाची पेरणी करून घरी परतत असताना वीज कोसळल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. 3) चामोर्शी तालुक्‍यातील लक्ष्मणपूर येथे घडली. संगीता टीकाराम मडावी (वय 35) असे मृत महिलेचे नाव आहे. 

लक्ष्मणपूर येथील टीकाराम मडावी व त्यांची पत्नी मृत संगीता टीकाराम मडावी हे दोघेही लक्ष्मणपूरपासून तीन किलोमीटर अंतरावरील मुधोली चक नं. 2 परिसरातील स्वतःच्या शेतामध्ये कपाशीच्या लागवडीसाठी गेले होते. दरम्यान, सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास शेतशिवारातून घराकडे परत येत असताना संगीता मडावी यांच्या अंगावर वीज पडली. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. पती मात्र काही अंतरावर असल्याने ते बचावले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a woman

टॅग्स
टॉपिकस