विजेच्या धक्‍क्‍याने महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 ऑगस्ट 2019

कामठी (जि.नागपूर) : उमरी येथील एका विवाहित महिलेचा राहत्या घरातील ओल आलेल्या भिंतीला स्पर्श झाल्याने विजेचा करंट लागून तिचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी(ता.8) सकाळी सहा वाजता घडली. या मृत महिलेचे नाव अश्विनी शेखर चाचेरे (वय 27,उमरी) असे आहे. प्राप्त माहितीनुसार महिलेच्या घराजवळील विद्युतखांबाचा ओल असलेल्या भिंतीला करंट आला. दरम्यान, ही महिला सकाळी उठून घरकामाला लागली. अचानक भिंतीला झालेल्या स्पर्शाने विजेचा तिला धक्‍का बसला. जबर धक्‍क्‍याने खाली पडलेल्या महिलेला उपचारार्थ नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तोवर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेला मृत घोषित केले.

कामठी (जि.नागपूर) : उमरी येथील एका विवाहित महिलेचा राहत्या घरातील ओल आलेल्या भिंतीला स्पर्श झाल्याने विजेचा करंट लागून तिचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी(ता.8) सकाळी सहा वाजता घडली. या मृत महिलेचे नाव अश्विनी शेखर चाचेरे (वय 27,उमरी) असे आहे. प्राप्त माहितीनुसार महिलेच्या घराजवळील विद्युतखांबाचा ओल असलेल्या भिंतीला करंट आला. दरम्यान, ही महिला सकाळी उठून घरकामाला लागली. अचानक भिंतीला झालेल्या स्पर्शाने विजेचा तिला धक्‍का बसला. जबर धक्‍क्‍याने खाली पडलेल्या महिलेला उपचारार्थ नजीकच्या रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, तोवर संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महिलेला मृत घोषित केले. मृत महिलेच्या पाठीमागे पती, सासू, सासरा, तसेच एकुलता एक दीड वर्षाचा चिमुकला मुलगा आहे. महिला शेतमजूर असून या गावात मागील 30 वर्षांपासून वास्ताव्यास आहे. घटनेची माहिती मिळताच तहसीलदार अरविंद हिंगे यांच्या मार्गदर्शनार्थ तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठून घटनास्थळाचा पंचनामा करीत आकस्मिक मृत्यूची नोंद घेतली.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Death of a woman due to lightning strike