शिरपूर येथे वीज पडून महिलेचा मृत्यू

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 डिसेंबर 2018

वणी (जि. यवतमाळ) : तालुक्‍यातील शिरपूर येथे शनिवारी (ता. 8) सायंकाळी सहा वाजता वीज पडून महिलेचा मृत्यू झाला; तर अन्य किरकोळ जखमी झाले. सुचिता महादेव गुरनुले (वय 32) असे मृत महिलेचे नाव आहे.
वणी तालुक्‍यात शनिवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान विजेच्या कडकडाटासह पाऊस सुरू झाला. पंधरा ते वीस मिनिटे पाऊस पडला. यावेळी गुरनुले यांच्या शेतात तीन-चार महिला कापूस वेचत होत्या. शेतात उपस्थित सर्वांना विजेचा झटका बसला. मात्र सुचिता याचा मृत्यू झाला.

जखमी महिलेला तिच्या पतीने बैलगाडीत टाकून मुख्य रस्त्यावर आणले. त्यानंतर रस्त्याने येणाऱ्या ऑटोरिक्षात टाकून शिरपूरच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले. वणीला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले; मात्र तिचा मृत्यू झाला.

Web Title: Death of a woman falls in electricity at Shirpur