महिला कर्मचारी अचानक कोसळली आणि घडली ही घटना; आता होताहेत आरोप-प्रत्यारोप  

Death of a woman worker in a government hospital
Death of a woman worker in a government hospital

चंद्रपूर  :  चंद्रपूर शासकीय वैद्यकीय रुग्णालय महाविद्यालयात रात्रीच्या वेळी स्पेशलिस्ट डॉक्टरला कॉल करूनही ते लवकर हजर होत नाहीत, असा आरोप रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांकडून केला जातो. एका महिला कर्मचाराचा ड्युटीवर असताना मृत्यू झाला. दुर्दैवाची बाब म्हणजे, रुग्णालयात वरिष्ठ डॉक्टर उपलब्ध न झाल्यामुळे या महिलेचा मृत्यू ओढावला. 

शासकीय रुग्णालयात अतिदक्षता विभागात ४ ऑगस्ट रोजी रात्री नवजात शिशुच्या अतिदक्षता विभागात कर्तव्यावर असताना संगीता पाटील नामक कंत्राटी सहायक महिला कर्मचारी जागेवर कोसळली. त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. परंतु, संपूर्ण रात्रभर एमडी,एमएस किंवा स्पेशालिस्ट डॉक्टर्स उपलब्ध झाले नाही. त्यामुळे तिची तपासणी झाली नाही. अखेर तिचा मृत्यू झाला. संगीता पाटील या कंत्राटी कामगार होत्या. कामगारांनी त्यांचा मृतदेह उचलण्यास नकार दिला. त्यामुळे परिस्थिती काही काळ चिघळली. 

नवजात शिशूच्या अतिदक्षता विभागात संगीता पाटील मंगळवारी  कर्तव्यवार होत्या. त्यावेळी त्या कोसळल्या. त्यानंतर त्यांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले. मात्र, तिथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांची तपासणी केली नाही, असा आरोप जनविकास कामगार संघटनेने केला आहे. यासंदर्भात संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला होता. परंतु ते आले नाही. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. मागील सहा महिन्यांपासून कंत्राटी कामगारांना वेतन नाही. याच धक्‍क्‍यामुळे तिचा मृत्यू झाला, असा संघटनेचा आरोप आहे. त्यामुळे मृतदेह उचलण्यास कामगारांनी नकार दिला. त्यामुळे काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. या महिलेला नुकसानभरपाई देण्याची मागणी संघटनेने केली आहे.

वारसांना नुकसानभरपाई देण्याची मागणी


या दवाखान्यांमध्ये वेळेवर उपचार होत नाहीत, त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा उपयोग तरी काय? असा प्रश्न कंत्राटी कामगारांच्या संघटनेनं केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी झाली पाहिजे. या ठिकाणी रात्री स्पेशलिस्ट डॉक्टरांना कॉल केला का? केला असेल तर डॉक्टर का आले नाही ? रूग्णावर तातडीने कोणते उपचार केले याची सखोल चौकशी करून जबाबदार अधिकाऱ्यांविरुद्ध कारवाई करावी, अशी मागणी संघटनेनं केली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आपल्याच कर्मचाऱ्यांना अपेक्षित उपचार देऊ शकत नसेल तर संबंधितांवर कारवाई आणि मृतकाच्या वारसांना नुकसानभरपाई देण्याची मागणी करण्यात आली आहे.
 

संपादन : अतुल मांगे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com