असे काय झाले की सुरेशकुमार परतलाच नाही? वाचा 

असे काय झाले की सुरेशकुमार परतलाच नाही? वाचा 

चिमूर (जि. चंद्रपूर) : सुरेशकुमार आसुराम चौधरी हा मुळचा राजस्थानचा रहिवासी. मात्र, काही कामानिमित्त तो चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती तालुक्‍यातील चंदनखेडा गावात राहत होता. तो नेहमी खडसंगी येथे राहत असलेल्या चुलत भावाकडे ये-जा करायचा. रविवारीही तो भावाकडे गेला; मात्र परत आला नाही. त्याच्याजवळ असेलेले पैसेही सापडले नाही. त्यामुळे सुरेशकुमार असे काय झाले, असा प्रश्‍न नागरिकांना पडला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत सुरेशकुमार आसुराम चौधरी (वय 22 वर्षे) हा राजस्थानमधील नागोर जिल्ह्यातील आहवेलिसीयार या गावचा मुळचा रहिवासी आहे. मागील चार महिन्यांपासून तो भद्रावती तालुक्‍यातील चंदनखेडा गावात राहत होता. तो खडसंगी येथे राहत असलेल्या चुलत भावाकडे नेहमीच ये-जा करीत असायचा. नेहमीप्रमाणे तो रविवारी (ता. 17) सकाळी चुलत भावाकडे आला होता. परंतु, सायंकाळी उशिरापर्यंत परत न आल्याने चुलत भावाने शोधाशोध केली. नातेवाईक व मित्रांनाही विचारपुस केली. मात्र, सुरेशकुमार कोणताही थांगपता लागला नाही. 

चुलत भाऊ विचारपुरस करीत असताना सोमवारी (ता. 18) पहाटेच्या सुमारास चिमूर पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या खडसंगी मुरपार मार्गावरील खोडदा नदी बंधाऱ्यातील खोल पाण्यात युवकाचा मृतदेह आढळून आला. भावाने जवळ जाऊन बघितले असता तो मृतदेह सुरेशकुमारचा असल्याचे स्पष्ट झाले. खोडदा नदीवरील बंधाऱ्याच्या पाण्याजवळ त्यांची चप्पल व इतर साहित्य आढळून आले होते. याची माहिती त्यांनी चिमूर पोलिसांना दिली. पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला व पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीयतपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. घटनेचा पुढील तपास स्वप्नील धुळे, चिमूर पोलिस करीत आहे. 

आत्महत्या की घातपात? 
मृताच्या नातेवाईकांनी चंदनखेडा येथून निघताना सुरेशकुमारजवळ चाळीस हजार रुपये असल्याची माहिती दिली. परंतु, घटनास्थळी त्याचा मोबाईल, चप्पल, जाकेट व पाकिटात दोनशे रुपये आढळून आले. सुरेशकुमारजवळ रक्कम आढळली नसल्याने नागरिक आत्महत्या की घातपात असा संशय व्यक्त करीत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com