कर्जमाफ योजना संथ गतीने ; शेतकरी योजनेपासून वंचित

नंदकिशोर वैरागडे 
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

कोरची : कर्जमाफीची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू आहे कर्जमाफीच्या घोषणेला जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटत असताना कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असल्याने अनेक शेतकरी शिवछत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेबद्दल वंचित राहत आहेत 

कोरची : कर्जमाफीची प्रक्रिया अतिशय संथ गतीने सुरू आहे कर्जमाफीच्या घोषणेला जवळपास एक वर्षाचा कालावधी लोटत असताना कर्जमाफीबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असल्याने अनेक शेतकरी शिवछत्रपती शिवाजी महाराज कर्ज माफी योजनेबद्दल वंचित राहत आहेत 

शासनाच्या परिपत्रकात 1 एप्रिल 2001 ते 31 मार्च 2016 पूर्वी उच्चल केलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे, असे परिपत्रकात नमूद असल्याने शेतकऱ्यांचे प्रश्न जाणारा मुख्यमंत्री या राज्यात कधी लाभेल अशी प्रतिक्रिया शेतकरी वर्गातून निघत आहे. पिक कर्ज घेतलेल्या शेतकरी थकबाकी झाल्याने त्यांच्या कर्जाचे पुनर्गठन हे फडणवीस सरकारने जून-जुलैमध्ये पुनर्घटन करण्यात आलेले आहेत. त्यामुळे 31 मार्च हे कर्ज परतफेड करण्याची वेळ असते.

कर्ज घेण्याची नाही कर्ज घेण्याची वेळ ही जून-जुलै असते. त्यामुळे शासनाने काढलेल्या परिपत्रकात शेतकऱ्यांच्या जीवावर उठत आहे या परिपत्रकात 30 जून 2016 राहिल्यास खरा लाभ या योजनेचा शेतकऱ्यांना होऊ शकतो. पण शासनाने काढलेल्या परिपत्रकामुळे बरेच शेतकरी या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. त्यामुळे यावर्षी कर्जवाटपाच्या निम्मा पल्लाही राष्ट्रीयीकृत बँक गाठू शकत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांवर सुद्धा कर्जाचे ओझे असून, नवीन कर्जासाठी ते पात्र ठरले नाही. याचा परिणाम म्हणजे मागील वर्षापासून कर्ज उच्च  करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रमाण अतिशय घटले आहे.

कोरची तालुक्यात राष्ट्रीय बँकेकडून आतापर्यंत फक्त पंधरा टक्के कर्ज वाटप झाल्याचे निदर्शनास येत आहे त्यामुळे शासनाने कर्जमाफीसाठी काढलेला परिपत्रकात 31 मार्च 2016 ऐवजी 30 जून 2016 करण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. तरच नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळू शकतो. शासनाला या योजनेचा लाभ खरंच द्यायचे असेल तर शासनाने आपली मानसिकता बदलून या परिपत्रकात बदल करणे गरजेचे आहे. तरच गडचिरोली जिल्ह्याच्या आदिवासी भागातील शेतकरी या योजनेत पात्र होतील.

शासनाने केलेल्या घोषणेची आदिवासी बांधवांमध्ये खूप उत्सुकता होती. पण जाचक अटीमुळे शेतकरी या योजनेपासून वंचित आहेत शिव छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेमध्ये शासनाने आधी कुटुंबातील एका व्यक्तीला या योजनेचा लाभ दिला जाईल असे परिपत्रक काढले होते. त्यानंतर त्यात आता बदल करून शेतकऱ्यांच्या कुटुंबातील प्रत्यक्ष दर्शन या योजनेचा कर्जमाफी संबंधित पात्र ठेवण्यात आलेले आहे.

त्यासाठी इतर निकषांच्या अधीन राहून दीड लाखाच्या मर्यादेपर्यंत शेतकरी कुटुंबातील प्रत्येक पात्र शेतकरी कर्जमाफी मिळू शकते, असे दुसरे परिपत्रक काढले. त्याच परिपत्रकात जर शासनाने 30 जून 2016 पर्यंत शेतकरी या योजनेत पात्र असतील, असे परिपत्रक काढल्यास जिल्ह्यातील बरेच शेतकरी या योजनेचा लाभ पात्र ठरू शकतील

Web Title: Debt relief plans slow Farmers are deprived of the scheme