शिक्षक पदभरतीसाठी उजाडणार डिसेंबर

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 20 सप्टेंबर 2019

नागपूर  : राज्याच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून 12 हजार शिक्षकांची पदभरती करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. मात्र, ऐनवेळी घेतलेल्या निर्णयाचा फायदा उमेदवारांना अद्याप मिळाला नाही. त्यासाठी डिसेंबरपर्यंतची वाट बघावी लागणार आहे. मात्र, निवडणुकांनंतर या पदभरती खरोखरच होतील का, याबद्दलही आता उमेदवारांमध्ये शंकेचे वातावरण आहे.

पवित्र पोर्टलमार्फत 12 हजार शिक्षकांची रिक्त पदे भरण्याबाबत शिक्षण विभागाने आराखडा तयार केला आहे. यासाठी 87 हजार उमेदवारांनी नोंदणीही केली आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलाखतीशिवाय शिक्षक भरती करण्याबाबत उमेदवारांची निवड यादी जाहीर केली आहे. यात 5 हजार 822 उमेदवारांचा समावेश केला होता. या उमेदवारांना कागदपत्रांची पडताळणी करून शाळांची नियुक्‍तिपत्रे देण्यात आलेली आहेत. उर्दू माध्यमातील आरक्षित जागेवर उमेदवार मिळत नसल्याने त्या जागा "कन्व्हर्ट' करण्यास शासनाकडून मान्यता देण्यात आली आहे. माजी सैनिकांच्या उमेदवारांची माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे. समांतर आरक्षणात पात्र असलेल्या उमेदवारांचीही तपासणी सुरू आहे. भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रत असणाऱ्या उमेदवारांचाही यात समावेश केला आहे. मात्र, ही प्रक्रिया लांबल्याने खासगी शाळांमधील पदभरतीही लांबली असल्याचे चित्र आहे. यातूनच विधानसभा निवडणुका झाल्यानंतर डिसेंबरच्या सुरुवातीला ही पदभरती होण्याची शक्‍यता आहे.
सात हजार उमेदवारांची तक्रार
पदभरतीच्या निवड यादीत 7 हजार उमेदवारांना संधी न मिळाल्याने शिक्षण आयुक्त कार्यालयात तक्रार अर्ज दाखल केले आहेत. याची तपासणी सुरू असून, यातील नियमांत बसणाऱ्या अर्जांचा गांभीर्याने विचार करून त्या उमेदवारांना नोकरी मिळावी, यासाठी विशेष प्रयत्न होणार आहेत, असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी नुकतेच स्पष्ट केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: December to celebrate teacher recruitment