हल्लेखोर वाळूतस्करांच्या अटकपूर्व जामिनावर आज निर्णय 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 10 ऑगस्ट 2018

भंडारा - मोहाडी तालुक्‍यातील रोहा येथे पोलिस पथकावर हल्ला केल्याप्रकरणी सहा जणांवर मोहाडी पोलिसांत गुन्हा दाखल केला. घटनेनंतर सहाही आरोपी फरार असून त्यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला. यावर आज, शुक्रवारी (ता. १०) निर्णय होणार आहे. 

अवैधरीत्या वाळूची वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्‍टरवर जप्तीची कारवाई करणाऱ्या पोलिस पथकावर हल्ला केल्याने स्थानिक गुन्हे शाखा सायबर सेलचे पोलिस जखमी झाले. याप्रकरणी मोहाडी पोलिसांनी भाजप कार्यकर्ता विश्‍वनाथ बांडेबुचे, ट्रॅक्‍टर चालक जनार्दन तितीरमारे, मार्कंड बांडेबुचे, कमलेश बांडेबुचे यांच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. शोधासाठी पाच पथके रवाना करण्यात आली होती. मात्र, आरोपी पोलिसांना िंमळाले नाहीत. 

Web Title: Decision on the anticipatory bail sand issue