पंधरा गावे टाकणार लोकसभा निवडणूकीवर बहिष्कार !

Decision to boycott Lok Sabha elections by fifteen villages in Yavatmal
Decision to boycott Lok Sabha elections by fifteen villages in Yavatmal

उमरखेड (जि. यवतमाळ) : गावाला जोडणारा रस्ता मिळावा, चांगले आरोग्य मिळावे, मुलांना योग्य शिक्षण मिळावे, या मूलभूत गरजा 75 वर्षांचा काळ लोटूनही अद्यापही मिळत नसेल, तर आपण या देशाचे नागरिक आहोत की नाहीत? रस्त्याअभावी मरणयातना भोगाव्या लागत आहेत. याकडे शासन व प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय पैनगंगा अभयारण्यामधील 15 गावांतील नागरिकांनी गुरुवारी (ता. 28) तालुक्यातील मोरचंडी गावात घेतलेल्या बैठकीत घेतला.

तालुक्यातील मोरचंडी, एकांबा, जेवली, मुरली, पिंपळगाव, सोनदाभी, परोटी, बोरी, थेरडी, गाडी, खरबी, टाकळी, शिवाजीनगर, जवराळा, देवरंगा आदी गावांतील ग्रामस्थांच्या बैठकीत रस्ते, आरोग्य, शिक्षणाच्या असुविधांबाबत आक्रोश व्यक्त करण्यात आला. मागील अनेक वर्षांपासून या सर्व गावांतील नागरिकांनी शासन, प्रशासनाविरोधात एकजुटीने लोकशाहीच्या मार्गाने लढा दिला. अनेकदा साखळी व बेमुदत उपोषण, मोरचंडी येथे 200 तरुणांचे आत्मदहनाचा प्रयत्न, उमरखेड तहसील कार्यालयाच्या वडाच्या झाडाला फाशी घेण्याचा प्रयत्न, जंगलात रस्त्यासाठी रस्त्यावर आठ दिवस बेमुदत उपोषण, मागील लोकसभा निवडणुकीवर पाच गावांचा बहिष्कार यांसह अनेक आंदोलने करण्यात आलीत.

मात्र, प्रत्येकवेळी केवळ पोकळ आश्वासनांशिवाय गावकर्‍यांना काहीच मिळाले नाही. नंदुरबारच्या धर्तीवर वनहक्क पेसा अ‍ॅक्ट लागू करावा, डोंगराळ भाग असूनही डोंगरी गावात गावे समाविष्ट करण्यात आली नाहीत. यांसह अनेक समस्या या गावकर्‍यांना भेडसावत असून, गावकर्‍यांच्या मनात समस्यांना घेऊन धगधगती आग निर्माण झाली आहे. त्यामुळे येणार्‍या प्रत्येक निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. 

मुख्यमंत्र्यांसोबत बैठक लागेपर्यंत बहिष्कार
गावांच्या समस्यांबाबत जोपर्यंत मुख्यमंत्री व वनमंत्री यांच्यासोबत बैठक लागत नाही, तोपर्यंत निवडणुकीवर बहिष्कार राहणार असल्याचा निश्‍चयही गावकर्‍यांनी केला आहे. शिवाय पैनगंगा अभयारण्य संघर्ष समितीने कालपासून सर्व गावांना भेटी देणे सुरू केले आहे. प्रत्येक गावाबाहेर निवडणुकीवर बहिष्कार टाकल्याचे फलक लावण्यात येणार आहेत. कोणत्याही पक्षाच्या वाहनाला गावात फिरू न देण्याचा इशाराही ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com