खडसेंच्या अर्जावर आज निर्णय 

खडसेंच्या अर्जावर आज निर्णय 

नागपूर - भोसरी येथील जमीन गैरव्यवहाराची चौकशी करणाऱ्या न्यायमूर्ती झोटिंग समितीच्या कार्यकक्षेवर माजी महसूलमंत्री एकनाथ खडसेंनी आक्षेप घेतला होता. समितीने अंतिम आदेशावरच्या वेळी या अर्जावर निर्णय घेण्याचा आदेश पारित केला. समितीच्या आदेशावर खडसेंनी पुन्हा आक्षेप घेतला. या अर्जावर दोन्ही पक्षांची बाजू घेतल्यानंतर समिती आता उद्या, गुरुवारी निर्णय देणार असल्याची माहिती आहे. 

पुणे जिल्ह्यातील भोसरी येथील एमआयडीसीची जागा पदाचा दुरुपयोग करून नातेवाइकांना दिल्याचा आरोप महसूलमंत्री असताना एकनाथ खडसे यांच्यावर झाला. याच आरोपामुळे त्यांना मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. या जमीन गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी निवृत्त न्यायमूर्ती डी. झोटिंग यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित केली. या समितीत सदस्य म्हणून जिल्हा सत्राचे निवृत्त न्यायाधीश मधुसूदन चौहान यांची नियुक्ती करण्यात आली. दहा महिन्यांपासून ही समिती चौकशी करीत आहे. यादरम्यान समितीने महसूल, एमआयडीसीसोबत एकनाथ खडसे व पुणे येथील जिल्हाधिकाऱ्यांची साक्ष नोंदविली. दरम्यान, एकनाथ खडसेंनी समितीच्या कार्यकक्षेवर आक्षेप घेत पुणे जिल्हाधिकाऱ्यांना नव्याने साक्ष नोंदविण्याचा अर्ज केला. पुणेच्या जिल्हाधिकाऱ्यांना बोलाविण्याचा अर्ज नाकारण्यात आला. तर, कार्यकक्षेवरील अर्जावर अंतिम अहवाल सुनावणीच्या वेळी निर्णय घेण्यात येईल, असा आदेश झोटिंग यांनी दिला. मात्र, यावर खडसेंनी सोमवारी आक्षेप घेतला. कार्यकक्षा निश्‍चित केल्यावरच अहवाल द्यावा, असा अर्ज त्यांनी दाखल केला. खडसेंकडून वरिष्ठ वकील ऍड. एम. जी. भांगडे यांनी तर एमआयडीसीतर्फे ऍड. चंद्रशेखर जलतारे यांनी बाजू मांडली. यावर आज समिती आपला निर्णय देणार होती. मात्र, पूर्ण अभ्यास न झाल्याने समिती गुरुवारला यावर निर्णय देणार असल्याचे समजते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com