आकर्षक सजावटीने मतदारांना पाडली भुरळ

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 21 ऑक्टोबर 2019

दारव्हा (यवतमाळ) : लोकशाहीच्या मजबुतीकरणासाठी मतदान महत्त्वाचे असून लोकांनी सकाळपासूनच शहरातील मतदार केंद्रावर रांगा लावल्या. स्थानिक शिवाजी विद्यालय येथील सखी महिला मतदान केंद्राच्या आकर्षक सजावटीमुळे दिवाळीचा भास मतदारांना होत होता. तर एडेड विद्यालय येथील आदर्श मतदान केंद्रावर स्काऊट गाईडच्या वतीने मतदारांचे स्वागत करण्यात येत होते. मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी प्रशासनाच्यावतीने केलेले प्रयत्न कौतुकास्पद आणि स्वागतार्ह असल्याच्या प्रतिक्रिया मतदारांनी दिल्या.

मतदानाचा टक्का वाढावा, मतदारांनी उत्साहाने मतदान करावे, या उद्देशाने प्रशासनातर्फे मतदान जनजागृतीसह विविध उपाययोजना करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये 378 मतदान केंद्रांपैकी संपूर्ण मतदारसंघात तीन सखी महिला मतदान केंद्र, तीन आदर्श मतदान केंद्र याशिवाय दिव्यांग मतदान केंद्र अशा प्रकारच्या मतदान केंद्राची निर्मिती केल्याची माहिती तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी अरुण शेलार यांनी दिली. ही सर्व मतदान केंद्र विविध साधनांच्या सजावटीतून आकर्षक करण्यात आली. फुगे आणि इतर साधनांनी मतदान केंद्र सजविण्यात आले. मतदान केंद्रांच्या प्रवेशद्वारावर रांगोळ्या काढण्यात आल्या. येथील शिवाजी विद्यालय येथे अशाचप्रकारे सखी मतदान केंद्राची निर्मिती करण्यात आली. फुगे व इतर साहित्याने मतदान केंद्र सजविण्यात आले. सोबतच मतदान केंद्राच्या प्रवेशद्वारावर रांगोळ्या काढून परिसर फुलविण्यात आला. मतदानासाठी आलेल्या अनेक लोकांना दिवाळी असल्याचा भास या मतदान केंद्रावर होत होता. तर शहरातील एडेड हायस्कूल येथील आदर्श मतदान केंद्रावरील अशाच प्रकारची सजावट करण्यात आली होती. या मतदान केंद्रावर येणाऱ्या प्रत्येक मतदारांचे स्वागत स्काऊट गाईड पथकाद्वारे करण्यात येत होते. आकर्षक सजावट व मतदारांचे स्वागत यातून शहरातील महिला सखी मतदान केंद्र व आदर्श मतदार केंद्र मतदारांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरले. प्रशासनाच्यावतीने मतदारांचा टक्का वाढवण्यासाठी केलेल्या प्रयत्नाबद्दल मतदारांनी गौरवोद्गार काढले .

शिवाजी विद्यालयातील केंद्रावर महिलाराज
शहरातील शिवाजी विद्यालयातील महिला सखी मतदान केंद्रांमध्ये निवडणूक कार्यावरील अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सर्वच महिलाच होत्या. या मतदान केंद्रात सर्व काही महिलांकडूनच सनियंत्रित करण्यात येत होते. या केंद्राच्या सुरक्षेवर विशेष लक्ष पुरविण्यात आल्याचे दिसून आले. हे केंद्र तहसील कार्यालय व पोलिस ठाण्याजवळ होते. या शिवाय हे मतदान केंद्र सतत निवडणूक प्रक्रियेतील अधिकाऱ्यांच्या संपर्कात असल्याची माहिती दिली गेली. सोबतच सजावटीतून मतदान केंद्राचे आकर्षणही वाढविण्यात आले होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Decorating the electorate with attractive decoration