दिवाळीच्या दिवशी "दीपक' काळोखात !

मनोज खुटाटे
मंगळवार, 29 ऑक्टोबर 2019

जलालखेडा (जि.नागपूर) : पंधरा दिवसांपूर्वी नरखेड तालुक्‍यातील पेठ मुक्तापूर या गावात मायलेकीचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले होते. मृतदेहाला वास सुटल्यानंतर ही घटना उघड झाली. सर्वत्र दिवाळी साजरा होत असताना मात्र झोपडीत या मायलेकीचा मृत्यू झाला होता. त्या झोपडीत मात्र दिवाळीचा दिवा पेटलाच नाही. 

जलालखेडा (जि.नागपूर) : पंधरा दिवसांपूर्वी नरखेड तालुक्‍यातील पेठ मुक्तापूर या गावात मायलेकीचे मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आले होते. मृतदेहाला वास सुटल्यानंतर ही घटना उघड झाली. सर्वत्र दिवाळी साजरा होत असताना मात्र झोपडीत या मायलेकीचा मृत्यू झाला होता. त्या झोपडीत मात्र दिवाळीचा दिवा पेटलाच नाही. 
     जलालखेडा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पेठ मुक्तापूर या गावात 17 ऑक्‍टोबरला पद्मा वसंतराव ढोणे (वय 50) व त्यांची मुलगी दीपिका (वय 26) या दोघीही मागील तीन चार दिवसांपासून दिसल्या नव्हत्या, अखेर त्या घरातून कुजल्याचा वास आल्यानंतर दोन्ही मायलेकी मृतावस्थेत आढळून आल्या. पोलिसांनी कार्यवाही केली व मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना केले. पोलिस हे काम करीत त्यांना गावकऱ्यांनी मदत केली नाही. शवविच्छेदनानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. पण, या दोघींचा नेमका मृत्यू कशाने झाला, हे मात्र कळू शकले नाही. यांचा मृत्यू एक तर भुकेमुळे किंवा आजारामुळे झाल्याचा अंदाज वर्तविला जात आहे.मायलेकीच्या मृत्यूनंतर ढोणे कुटुंबात मुलगा दीपक राहिला आहे. तो गतिमंद आहे. या हृदयद्रावक घटनेनंतर याकडे शासन व प्रशासनाने लक्ष दिलेच नाही तर कोणी याची माहिती जाणून घेण्याच तसदी घेतली नाही. या घटनेच्या कालावधीत विधानसभेचा प्रचार सुरू होता, मात्र कोणतेही नेते याकडे फिरकले नाही. गरिबांचा वाली कोणीच नाही? असा प्रश्न पुन्हा उपस्थित झाला आहे. 
दीपकला न्याय मिळावा 
दीपक हा उपेक्षित जीवन जगत आहे. मिळेल ते खावून जीवन तो जगत आहे. मायलेकीचा मृत्यू भूकबळी आहे का याचाही शोध घेणे गरजेचे ठरले आहे. एरवी विविध लहानसहान घटनेसाठी रस्त्यावर येणारे दलित नेतेदेखील निवडणुकीच्या रणधुमाळीत याकडे सोईस्कररित्या दुर्लक्ष करीत आहेत. दीपकला न्याय मिळावा, हक्काचे अन्न मिळावे यासाठी या घटनेचा सखोल तपास करणे गरजेचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: "Deepak" in the dark on Diwali day!