esakal | उपचाराअभावी हरणाच्या पाडसाचा मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

उपचाराअभावी हरणाच्या पाडसाचा मृत्यू

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कामठी (जि.नागपूर) : वनविभागाच्या गलथान कारभारामुळे उपचाराअभावी हरणाच्या पाडसाचा मृत्यू झाल्याची घटना रविवारी (ता.25) सायंकाळी आठच्या सुमारास तालुक्‍यातील आजनी (रडके) येथे घडली.
प्राप्त माहितीनुसार तालुक्‍यातील आजनी (रडके) या गावाला लागूनच कामठी मिलिटरी छावणी परिसर आहे. या परिसरात मोर, जंगली डुक्कर, हरीण या जंगली प्राण्यांचा मुक्तसंचार असतो. रविवारी सायंकाळच्या सुमारास हरणाचे पाडस भटकत गावात शिरल्याने गावातील भटक्‍या कुत्र्यांनी त्याच्यावर पाच वाजताच्या सुमारास हल्ला केला. हल्ल्यात ते पाडस जखमी झाले. गावकऱ्यांनी कुत्र्यांच्या तावडीतून हरणाची सुटका करून स्थानिक नवीन कामठी पोलिस ठाण्यात माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिस बिसन पोटभरे, देवीदास मंडाली घटनास्थळी दाखल झाले. कंट्रोल रूममधून वनविभागाला माहिती दिली. परंतु, वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी तब्बल चार तास उशिरा म्हणजे साडेनऊ वाजता पोहोचल्याने त्याआधी रात्री आठ वाजता त्या पाडसाने प्राण सोडले. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी वेळेवर पोहोचले असते तर त्या पाडसावर वेळीच उपचार करता आले असते. वनविभागाचे क्षेत्र सहायक निशिकांत वाघ व वनरक्षक चोखराम बाहेकर यांनी पंचनामा करून मृत हरणाला ताब्यात घेतले. यावेळी गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यावरून ऑटोचालकासोबत ऋषीचा वाद झाला. परंतु, त्याठिकाणी लोक गोळा झाल्याने आरोपींचा प्रयत्न फसला. गोंडवाना चौक ते नेल्सन मंडेला चौकदरम्यान सदोदय अपार्टमेंटसमोर ऋषीने कार थांबवून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना आरोपींनी त्याला गाठले आणि जागीच ठार केले.

loading image
go to top