पदवी प्रवेशातील याद्यांची तपासणी होणार

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

नागपूर - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाद्वारे पदवी अभ्यासक्रमातील प्रवेशासाठी कॉमन वेळापत्रक दिले. त्यानुसार २५ जूनपासून महाविद्यालयांनी प्रवेशास सुरुवात केली. आता शनिवारपर्यंत (ता. ३०) महाविद्यालयांमध्ये प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र, प्रक्रियेमध्ये गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिले किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी विद्यापीठाकडून निरीक्षक पाठविण्यात येत आहे. 

बारावीचा निकाल घोषित झाल्याच्या दिनांकापासून संलग्नित कॉलेजेसला प्रवेश अर्ज विक्री करावयाची होती. २० जूनपर्यंत प्रवेश अर्ज विक्री व स्वीकारण्यात आले. आता शनिवारपर्यंत (ता.३०) गुणवत्ता यादीनुसार प्रवेश निश्‍चित करावयाचे आहेत. या कालावधीमध्ये विद्यार्थी प्रवेश घेणार आहेत. 
प्रक्रियेदरम्यान बऱ्याच महाविद्यालयात गुणवत्ता यादीनुसार प्रवेश मिळत नसल्याची विद्यार्थी संघटनांची तक्रार असते. विशेष म्हणजे यादीत नाव असतानाही प्रवेश मिळाला नाही, यासाठी संघटना विद्यापीठात मोर्चे आणून आंदोलन करतात. त्यामुळे महाविद्यालयाने प्रकाशित केलेल्या यादीनुसारच प्रवेश होताहेत काय? याची तपासणी करण्यासाठी विद्यापीठाने महाविद्यालयनिहाय निरीक्षकांची नेमणूक केली आहे. हे निरीक्षक महाविद्यालयांना भेटी देऊन यादीनुसारच प्रवेश झाले किंवा नाही याची शहानिशा करणार आहेत. 

याचा अहवाल प्र-कुलगुरूंकडे देण्यात येईल. ३० जूननंतर रिक्त राहिलेल्या जागांवर प्रतीक्षा यादीतील प्रवेश निश्‍चित करावयाचे आहेत. त्यासाठी दोन जुलैपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. आवश्‍यकता पडल्यास पाच जुलैपासून कौन्सिलिंग व स्पॉट ॲडमिशन महाविद्यालयांना देता येणार आहे. 

असलेल्या जागा
कला     ४०,०००
वाणिज्य    ३०,०००
विज्ञान    ३५,०००
विधी    १,५००
गृहविज्ञान     ४००
गृहअर्थशास्त्र    ५००

वेळापत्रक
 २५ ते ३० जून - गुणवत्ता यादीनुसार प्रवेश देणे
 २ जुलै - प्रतीक्षा यादीतील प्रवेश पूर्ण करणे
 ५ जुलै - रिक्त जागांवर प्रवेश देणे

Web Title: The degree entrance entry will be examined