गटविकास अधिकारी वाघमारेवर कार्यवाहिची मागणी

मनोहर बोरकर
शनिवार, 30 जून 2018

एटापल्ली (गडचिरोली) : येथील गटविकास अधिकारी अनिल वाघमारे हे कामावर रुजू झाल्यापासून एक दिवसही मुख्यालयात हजर राहीले नाहीत. त्यामुळे तालुक्याच्या विकासावर विपरीत परिणाम झाला असून, त्यांचे कार्यकाळाची चौकशी करून कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सभापति बेबी लेकामी, उपसभापति नितेश नरोटी, सदस्य जनार्धन नल्लावार व पदाधिकाऱ्यांनी मुख्यकार्यपालन अधिकारी यांना निवेदनातून केली आहे.

वाघमारे मागील एक वर्षापासून पंचायत समिती एटापल्ली येथे कार्यरत आहेत. ते रुजू झाल्यापासून मुख्यालयात उपस्थित राहीले नाहीत. ते पस्तीस किमी अंतरावर असलेल्या अहेरी या शहरातून ये-जा करतात त्यामुळे इतरही विस्तार अधिकारी व कर्मचारी हे बाहेरील शाहरातून ये-जा करून कर्तव्य बजावत आहेत. परिणामी विकास कामे व योजनांवर विपरीत परिणाम होऊन, घरकुल, शौचालय, सिंचन विहिरी आदी शेतकरी, शेतमजूर व विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शासकीय लाभच्या योजनांपासून वंचित रहावे लागत आहे. तसेच पंचायत समिती मालकीच्या मुख्य बाजारपेठेतिल दोन ते तीन एकर भूखंडावर भूमाफियांचे बेधडक अतिक्रमण करून भूखंड हडप करण्याचा प्रकार होतांना गटविकास अधिकारी वाघमारे हे नागरिकांचे तक्रारीकड़े जानीवपूर्वक दुर्लक्ष करतात असेही आरोप सभापती व इतर पदाधिकाऱ्यांनी निवेदनातून केला आहे.

त्यामुळे अशा अकार्यक्षम गटविकास अधिकारी अनिल वाघमारे यांचे संपूर्ण कार्यकाळाची सखोल चौकशी करून कठोर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी सभापती बेबी लेकामी, उपसभापति नितेश नरोटी, सदस्य जनार्धन  नल्लावार, संगीता दूर्वा व निर्मला गावडे यांनी केली आहे अन्यथा तिव्र आंदोलन उभरले जाईल असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे.

वरील तक्रारीतील संपुर्ण आरोप खोटे व बिनबुडचे आहेत. मी माझे कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असून कोणतीही चौकशीला सामोरे जाण्याची माझी तयारी आहे.

 अनिल वाघमारे, गटविकास अधिकारी पंचायत समिति एटापल्ली

Web Title: Demand for action on Village Development Officer Waghmare