अकोला ते मूर्तिजापूर महामार्गाच्या दुरुस्तीची मागणी; आंदोलनाचा इशारा

Demand for repair of Akola to Murtijapur highway Agitation alert
Demand for repair of Akola to Murtijapur highway Agitation alert

अकोला (बोरगावमंजू) - अकोला ते मूर्तिजापूर या राष्ट्रीय महामार्गावर रस्त्याच्या मध्यभागी मोठे-मोठे खड्डे पडले अाहेत. अनेक ठिकाणी रस्ता उखडलेला आहे. महामार्ग खड्डेमय झाल्याने वाहनधारकांना प्रवास जीव मुठीत घेऊन करावा लागत आहे. महामार्गावर खड्ड्यांमूळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. त्यामुळे याकडे प्रशासनाने लक्ष देणे गरजेचे आहे.

आगामी नवरात्र उत्सव आणि धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्सव येत आहे. परिसरातील नागरिका या मार्गाने नवरात्री उत्सवात कुटूंबासह कुरणखेड येथील चंडिका देवीचे, डोंगरगाव येथे अंबा देवीचे दर्शन घेण्यासाठी येतात. तसेच धम्मचक्र प्रर्वतन दिनासाठी दुसऱ्या दिवशी अकोला येथे हजारो भीम अनुयायी विविध कार्यक्रमांसाठी जातात. या सण उत्सवाच्या दरम्यान महामार्गाने मोठ्या प्रमाणात गर्दी राहते. मात्र राष्ट्रीय महामार्गावरील अकोला जवळील शिवणी ते बोरगावमंजू, कुरणखेडपर्यंत खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले आहे. त्यामुळे सामान्य वाहनधारकांसह भाविक-भक्तांना जीव मुठीत घेऊन त्रास सहन करावा लागत आहे.

अपघात टाळण्यासाठी गत तीन ते चार वर्षापासून महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू झाले असले तरी त्याला पूर्ण होण्यास वेळ लागेल. तो पर्यंत अपघात टाळता यावा व वाहनधारकांना कुठलाही त्रास होवू नये यासाठी रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविणे गरजेचे आहे. याकडे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाने त्वरित लक्ष द्यावे अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करीत आहेत.

महामार्गाचे काम (बीओटी ) बांधा, वापरा, हस्तांतरित करा, या तत्वावर आय. एल. अँड एस.एस. कंपनीला दिले असून रस्ता बांधणे, पूर्ण करणे व त्याची देखभाल दुरुस्ती करणे ही जबाबदारी दिली आहे. खड्डे बुजवण्याबाबत कंपनीला नोटीस दिली आहे. जर खड्डे बुजविले नाही, तर महामार्ग प्राधिकरण खड्डे बुजविण्याच्या निविदा काढणार.
- विलास ब्राम्हणकर, महाप्रंबधक तथा प्रकल्प संचालक, राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण विभाग.

विविध पक्ष, संघटना आक्रमक -
राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे जनतेला होणारा त्रास भविष्यात धोकादायक व जीवघेणा ठरत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने लक्ष द्यावे, अन्यथा ग्रामीण पत्रकार संघ राज्य सचिव संजय वानखडे, शिवसेना तालुका सरचिटणीस योगेश बोडदे, मनसे तालुका अध्यक्ष सतीश फाले, अखिल भारतीय छावाचे आय.टी. प्रमुख योगेश विजयकर, ग्रापंचायत सदस्य ज्ञानेश्वर वानखडे, राहुल वानखडे यांच्यासह अनेक संघटना रस्त्यावर येऊन आंदोलन छेडतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com